शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

चौथा स्तंभ असल्याचा प्रसारमाध्यमांना विसर

By admin | Updated: December 10, 2014 23:47 IST

जयदेव डोळे : सत्तेच्या बाहेर राहून माध्यमांनी काम केल्यास देश बळकट--अवि पानसरे व्याख्यानमाला

कोल्हापूर : वाढत्या शहरीकरणामुळे परावलंबित्व वाढत असताना प्रसारमाध्यमे मात्र लोकशाहीतील चौथा स्तंभ असल्याचे विसरून सरकारमधील हिस्सा असल्यासारखी वागत आहेत. सत्तेच्या बाहेर राहून घटनेने दिलेल्या अधिकारात माध्यमांनी वाटचाल केली तरच अर्धपोटी, अर्धशिक्षित व अंधश्रद्धेच्या गर्तेत सापडलेला देश त्यावर मात करून बळकटपणे उभा राहू शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, विश्लेषक जयदेव डोळे यांनी आज, बुधवारी येथे बोलताना केले. येथील श्रमिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अवि पानसरे व्याख्यानमालेत ‘प्रसारमाध्यमे आणि लोकशाही’ या विषयावर जयदेव डोळे बोलत होेते. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डॉ. विलास पोवार होते. आपल्या सुमारे एक तासाच्या व्याख्यानात डोळे यांनी प्रसारमाध्यमांची आजची वाटचाल कशा पद्धतीने सुरू आहे, ही माध्यमं राजकारणी, उद्योगपती, भांडवलदारांच्या मालकीची कशी होत आहेत, यावरच प्रामुख्याने प्रकाशझोत टाकला. जर प्रसारमाध्यमांचे मालकच सत्तेतील हिस्सा असल्यासारखे वागायला लागले तर उपेक्षितांना न्याय कोणी मिळवून द्यायचा? या प्रश्नावर त्यांनी बोट ठेवले. राजकारणात विरोधी पक्ष नसतो तेव्हा प्रसारमाध्यमांनी विरोधी पक्षाची भूमिका बजावायची असते; परंतु दुर्दैवाने ही जबाबदारी प्रसारमाध्यमांवर पडलेली आहे हे माहीत नसल्यासारखी स्थिती सध्या महाराष्ट्रात आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. ज्यांनी दखल घ्यायला पाहिजे त्या वर्तमानपत्रांनी ‘रोजचंच मढं’ समजून त्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली आहे. माध्यमांची जबाबदारी असताना या प्रश्नाची मांडणी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती तशी झाली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. बातमी साधी सरळ, सोपी असत नाही, असा समज झालेली माध्यमं आता चटपटीत, फोडणी दिलेल्या बातम्या देण्याच्या मागे लागली आहेत. वाचकांना वैचारिक, तात्त्विक, बौद्धिक नको आहे, असा स्वत:चा ग्रह करून घेतल्याने वैचारिक घसरण होत आहे. त्यातच उद्योगपती, राजकारण्यांच्या हातात गेलेली माध्यमं आपण सत्तेतील हिस्सा असून आपणच सत्तेचे सूत्रसंचालन करीत आहोत अशा भ्रमात असल्याने माध्यमांचे अध:पतनही मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहे, असे डोळे म्हणाले. आपल्या ताकदीचा गैरसमज करून घेतल्याने सरकार यंत्रणेला धाक दाखविण्याचे काम माध्यमे विसरली आहेत. आपण सत्तेतील नाही आहोत, असे समजून लिखाण केले तरच समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम या चौथ्या स्तंभाकडून होऊ शकेल. सागर कश्यप यांनी स्वागत केले, तर मोनिका क्षीरसागर यांनी आभार मानले.