संदीप आडनाईक -कोल्हापूर -शिवाजी विद्यापीठाने ५ मे २0१५ रोजी घेतलेल्या एम. कॉम. (भाग एक) च्या दुसऱ्या सत्रातील मे २0१५च्या परीक्षेतील अॅडव्हान्स अकौंटन्सी विषयातील टॅक्सेशन (पेपर क्रमांक चार) पेपरच्या चुकीच्या आराखड्याचा भुर्दंड या विषयाच्या विद्यार्थ्यांना बसणार आहे. शिवाजी विद्यापीठाने २0१४ च्या प्रथम सत्राच्या प्रश्नपत्रिकेचा जो मूळ आराखडा दिला होता, तो आराखडा आणि ५ मे रोजी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा पूर्णता वेगळा असल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. या प्रश्नपत्रिकेत पेपर सेटिंग करणाऱ्यांनी विद्यार्थ्यांना दिला जाणारा सहावा प्रश्नच गायब केला आहे. यासंदर्भात काही विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दिवशीच परीक्षा विभागाच्या समन्वयकांकडे तक्रार केली होती; परंतु तोंडी तक्रारीला विद्यापीठाने उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान, यासंदर्भात शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने एम.कॉम.च्या संबंधित विषयाच्या चुकीच्या प्रश्नपत्रिकेबाबत वाणिज्य विषयाच्या विभागप्रमुखांना कळविल्याचे सांगितले आहे. याबाबत विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले आहे. घोषित आराखड्यानुसार एकूण प्रत्येकी १६ गुणांचे ६ प्रश्न विचारले जाणे अपेक्षित आहे. त्यातील प्रश्न क्रमांक १ आणि २ हे अपरिहार्य आहेत. असे एकूण सहापैकी पाच प्रश्न सोडविणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पर्याय उपलब्ध असतो. ५ मे रोजी झालेल्या परीक्षेदरम्यान या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रत्यक्षात पाच प्रश्नच विचारले गेले आणि हे सर्वच्या सर्वच प्रश्न अपरिहार्य होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकही पर्याय उपलब्ध नव्हता. त्यामुळे अशा प्रकारच्या पेपरसेटिंग्जचा या विद्यार्थ्यांना फटका बसलेला आहे.‘अभाविप’च्या मागण्याविद्यार्थ्यांनी लिहिलेल्या एकूण प्रश्नापैकी अधिक गुणाचे चार प्रश्न निवडून एकूण ८0 ऐवजी ६४ गुणांपैकीच मूल्यांकन करावे६४ पैकी गुणांचे मूल्यांकन करून त्या गुणांचे रूपांतर ८0 पैकी करून अंतिम गुण निश्चित करावेतसंबंधित पेपर सेंटरची चौकशी करून त्याच्यावरील कारवाईची माहिती तक्रारदार म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला लेखी कळवावे ४वाणिज्य विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी ‘अभाविप’च्या शिष्टमंडळाची थेट बैठक आयोजित करावी, अशा मागण्या विद्यार्थी परिषदेने केल्या आहेत.शिवाजी विद्यापीठाने विद्यार्थी केंद्रित आपली भूमिका सिद्ध करण्यासाठी त्वरित या विषयात विद्यापीठ कायद्यानुसार विद्यार्थी हिताची पावले उचलावीत. संबंधित विद्यार्थ्यांना न्याय्य मिळवून द्यावा.पंकज पाटील, महानगर मंत्री, अभाविप.
एम.कॉम.च्या विद्यार्थ्यांना भुर्दंड ?
By admin | Updated: May 29, 2015 00:19 IST