शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

आरसी गँगवर मोक्का; प्रस्ताव तयार

By admin | Updated: January 17, 2017 00:41 IST

गंभीर गुन्हे : म्होरक्या रवी शिंदे याच्यासह १९ साथीदारांचा समावेश

एकनाथ पाटील ल्ल कोल्हापूरकर्नाटक-महाराष्ट्रात तीसपेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरसी गँगचा म्होरक्या रवी शिंदे याच्यासह त्याच्या १९ साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यासाठी पोलिसांनी प्रस्ताव तयार केला आहे. तो मंजुरीसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. एसटी गँगचा म्होरक्या स्वप्निल तहसीलदारपाठोपाठ आरसी गँगला मोक्का लावून जिल्ह्यांतील गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात खून, घरफोड्या, लूटमारीसारख्या घटना वाढत आहेत. राजकीय पाठबळामुळे जिल्ह्यात गुन्हेगारी फोफावली आहे. गँगवार, वर्चस्ववादातून खून, खुनाचे प्रयत्न अशा गंभीर घटना घडू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी आरसी गँगने रस्त्यावर गोळीबार करण्याचे धाडस केले होते. त्यामुळे जिल्हा पोलिस प्रशासनाने गुन्हेगारीची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी आरसी गँगवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यासाठी पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे यांनी प्रस्ताव पाठविण्याचे आदेश शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांना दिले.त्यानुसार त्यांनी गँगचा म्होरक्या रवी शिंदे याच्यासह १९ जणांची यादी तयार केली आहे. शिंदे याच्यावर संगमेश्वरसह राजारामपुरी, करवीर, लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा पोलिस ठाण्यात संघटित गुन्हेगारीचे तीसपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. त्याच्या साथीदारांच्या गुन्ह्णांची कुंडलीही काढली आहे. हा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांच्याकडे पाठविण्याची तयारी केली आहे. यापूर्वी झालेली मोक्का कारवाई अवधूत माळवी खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार संजय भैरू वास्कर, सार्वजनिक उत्सव व निवडणुकीमध्ये उपद्व्याप करणारे गुंड शशिकांत बाबासाहेब गायकवाड, कुणाल राजाराम गायकवाड, सिद्धार्थ राजाराम माने, निवास दत्तात्रय जाधव (सर्व रा. रमणमळा, कसबा बावडा), जिल्ह्णांत मुंबई, कराड, सांगली, मिरज, कर्नाटक येथील गुन्हेगारी टोळ्यांशी लागेबांधे असणाऱ्या एसटी गँगचा म्होरक्या स्वप्निल तहसीलदार याच्यासह साईराज दीपक जाधव, विजय ऊर्फ रॉबर्ट रवींद्र खोडवे, प्रसन्न सूर्यकांत आवटे, अनिकेत आनंदराव सातपुते, सनी प्रताप देशपांडे, विठ्ठल काशीनाथ सुतार, तुषार शिवाजी डवरी, राकेश किरण कारंडे (सर्व रा. राजारामपुरी). पेठवडगाव-वाठार परिसरात अवैध व्यवसायाबरोबरच गुंडगिरी करणाऱ्या राज ऊर्फ राजवर्धन बाबासो पाटील, पप्पू ऊर्फ प्रवीण माने, राकेश हाके या चार गुन्हेगारी टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का अंतर्गत कारवाई झाली. हे सर्व गुन्हेगार कळंबा मध्यवर्ती कारागृहात खितपत पडले आहेत.कारवाई होणाऱ्या संशयितांची नावे रवी सुरेश शिंदे, (रा. साळोखे पार्क), विकास दीपक केसरकर, धीरज दीपक देवकर, आकाश गणेश पाटील, गणेश बाळू पाटील, प्रकाश बापू लाखे (सर्व रा. राजेंद्रनगर) योगेश मानसिंग पाटील (रा. मंगळवार पेठ), जावेद इब्राहिम सय्यद, संदीप मोतीराम गायकवाड, सागर प्रभुदास व्हटकर, रणजित मारुती कांबळे, जयसिंग सिकंदर इंद्रेकर, आकाश अशोक कदम, प्रकाश कुबेर कांबळे, सागर सखाराम मांडवकर (सर्व रा. जवाहरनगर), अमित अंकुश बामणे, सनी राम साळे (दोघे, रा. सुभाषनगर), शीतल प्रदीप सावंत (शास्त्रीनगर), अमित दस्तगीर चौगले (टेंबलाई रेल्वे फाटक).