शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

महापौर निवड तारीख अनिश्चित

By admin | Updated: May 12, 2016 00:52 IST

ईर्षा ताणली तर निवडणूक --महापालिका प्रशासनास सहा महिन्यांच्या आत सात प्रभागांत नव्याने पोटनिवडणूक घ्यावी लागेल.

कोल्हापूर : महापालिकेचे महापौरपद रिक्त झाल्यामुळे नवीन महापौर निवडीसाठी मनपा प्रशासनाने विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून तारीख निश्चित करून देण्याची विनंती केली आहे. मंगळवारी हे पत्र पाठविण्यात आले. मात्र, बुधवारी त्यासंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयाने काहीही कळविलेले नाही. त्यामुळे महापौर निवडीची तारीख अनिश्चित आहे. महापौर निवडीचा कार्यक्रम ठरविण्यासाठी किमान दहा दिवसांचा अवधी द्यावा लागतो. त्यामुळे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील तारीख निश्चित केली जाऊ शकते. जर नगरसेवकांच्या जातीच्या दाखल्यासंदर्भातील कारवाईस उच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाली तर महापौर निवडीचा कार्यक्रम रद्द करावा लागणार आहे. त्यामुळे महापौर निवड होणार की नाही हे न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे. दरम्यान, ज्या सात नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द झाले, त्या प्रभागात पोटनिवडणूक लागणार का? महापौरपदाची निवडणूक लागणार का? ज्यांनी सहा महिन्यांच्या मुदतीत जातीचे दाखले वैध असल्याचे प्रमाणपत्र दिले नाही, त्यांचे नगरसेवकपद जाणार का? आदी प्रश्नांनी शहरवासीयांची उत्कंठा वाढविली आहेच, शिवाय राजकारणही तापविले आहे. ईर्षा ताणली तर निवडणूक भाजपने जर राजकीय ईर्षेपोटी कॉँग्रेस व राष्ट्रवादीला शह द्यायचे ठरविलेच तर घाईगडबडीने महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो. कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आहेत, त्यामुळे विभागीय आयुक्तांना सांगून ते निवडणूक लवकर घेऊ शकतात. अधिकाऱ्यांचे सॅँडविचसत्तेच्या राजकारणात काठावरचे बहुमत असते आणि राजकीय संघर्ष तीव्र असतो, तेव्हा अधिकारी वर्गास त्रास होत असतो. महानगरपालिकेत गेल्या सहा महिन्यांत हा त्रास वाढला आहे. राजकीय संघर्ष अधिकाऱ्याची डोकेदुखी बनली आहे. काय होऊ शकते? विभागीय जात पडताळणी समितीच्या निकालाविरोधात सातही अपात्र नगरसेवकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.उच्च न्यायालयातून समितीच्या निकालास स्थगिती दिली जाऊ शकते किंवा स्थगिती न देता सुनावणी घेतली जाऊ शकते. जर स्थगिती दिली तर, पुन्हा नगरसेवक म्हणून काम करण्यास मुभा मिळू शकते. न्यायालयाने स्थगिती दिली तर महापौर म्हणून कामकाज पाहण्यास पुन्हा अश्विनी रामाणे यांना संधी मिळू शकते. न्यायालयाने स्थगिती दिली नाही, तर मात्र महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो. महापालिका प्रशासनास सहा महिन्यांच्या आत सात प्रभागांत नव्याने पोटनिवडणूक घ्यावी लागेल.