शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

हद्दवाढीसंदर्भात ३० मे रोजी तज्ज्ञ समिती कोल्हापुरात

By admin | Updated: May 21, 2016 00:59 IST

हद्दवाढ करण्यासंदर्भात दोन्ही बाजूंनी अभ्यास करण्याकरिता तज्ज्ञांची समिती नेमण्यात येत असल्याचे सांगितले होते.

कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीला असलेला विरोध आणि समर्थन अशा दोन्ही बाजूंचा अभ्यास करून शासनाला अहवाल देण्याची कामगिरी सोपविण्यात आलेली दोनसदस्यीय समिती ३० व ३१ मे रोजी कोल्हापुरात येणार आहे. ही समिती दोन्ही बाजूंच्या लोकांची मते जाणून घेणार आहे; तसेच भौगोलिक अभ्यासही करणार आहे. कोल्हापुरात सर्वपक्षीय हद्दवाढ समितीच्या शिष्टमंडळाशी बोलताना ५ मे रोजी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी हद्दवाढ करण्यासंदर्भात दोन्ही बाजूंनी अभ्यास करण्याकरिता तज्ज्ञांची समिती नेमण्यात येत असल्याचे सांगितले होते. त्यानुसार शुक्रवारी नगरविकास विभागाने अतीश परशुराम व ज. ना. पाटील या दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. राज्यातील अनेक महानगरपालिकांनी हद्दीची वाढ करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी ज. ना. पाटील यांनी सविस्तर अभ्यास करून शासनाला निर्णय घेण्याकरिता अहवाल दिले होते. त्यांचा या विषयाचा चांगला अभ्यास आहे. त्यामुळे या दोघांवर कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्याकरिता परिपूर्ण अहवाल देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ही समिती ३० आणि ३१ मे या दोन दिवसांत कोल्हापुरात येऊन हद्दवाढ समर्थक आणि विरोधक तसेच अन्य लोकांची भेट घेऊन त्यांची मते जाणून घेणार आहे. शिवाय महानगरपालिका प्रशासनाचा प्रस्ताव तसेच जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार भौगोलिकदृष्ट्या अभ्यास करणार आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीला फोनवरून ही माहिती सांगितली. महानगरपालिका प्रशासनाने शहरालगतची १८ गावे आणि दोन औद्योगिक वसाहतींचा हद्दवाढीत समावेश करावा, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे; परंतु या मागणीला ग्रामीण भागातून विरोधही झाला आहे. त्यामुळे पालकमंत्री पाटील यांनी या प्रश्नातून सकारात्मक मार्ग काढण्यासाठी समिती नेमली आहे. गेल्याच आठवड्यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन समिती नेमण्याची विनंती केली होती. पालकमंत्री पाटील हद्दवाढ करण्याबाबत सकारात्मक विचार करीत असले तरी असा निर्णय घेताना सर्वांना विश्वासात घेण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. (प्रतिनिधी)