शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी कोल्हापूरचे मावळे ‘रायगड’ला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीने यावर्षी शिवराज्याभिषेकदिनाचा सोहळा आज, शनिवारी आणि उद्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीने यावर्षी शिवराज्याभिषेकदिनाचा सोहळा आज, शनिवारी आणि उद्या रविवारी दुर्गराज रायगडावर मोजक्या वीस जणांच्या उपस्थितीत साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या सोहळ्यासाठी कोल्हापूरचे हे मावळे शिवछत्रपतींचा जयजयकार करत शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास रवाना झाले.

जुना राजवाडा येथून खासगी बसमधून सोहळ्यासाठीचे आवश्यक साहित्य घेऊन हे मावळे रायगडकडे निघाले. त्यामध्ये महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, सदस्य संजय पवार, हेमंत साळोखे, विनायक फाळके, प्रसन्न मोहिते, सागर पाटील, राहुल शिंदे, राम यादव, सुखदेव गिरी, प्रवीण हुबाळे, सुजित जाधव, अजय पाटील, उदय बाेंद्रे, भरत कांबळे, दीपक सपाटे, दया हुबाळे, अमर जुगर, संतोष शिनगारे रवाना झाले. यावेळी उदय घोरपडे, बाबा महाडिक आदी उपस्थित होते. दरम्यान, गिरगाव (ता. करवीर) येथील चित्रकार युवराज जाधव यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिवछत्रपतींचे सिंहासनाधिष्ठित पाच फूट उंचीचे तैलचित्र साकारले आहे. त्याचे अनावरण युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी न्यू पॅॅलेस येथे केले. यावेळी चित्रकार जाधव, राम यादव, अभिजीत तिवले उपस्थित होते. चित्रकार जाधव हे तपोवन हायस्कूलमध्ये कलाशिक्षक आहेत. त्यांनी शिवछत्रपतींच्या समकालीन चित्रांचा अभ्यास करून हे तैलचित्र साकारले आहे. त्यासाठी त्यांना सहा महिने लागले.

----------------------------------

शिवभक्तांनी घरी सोहळा साजरा करावा

कोरोनाच्या संकटामुळे मोजक्या मावळ्यांच्या उपस्थितीत रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होईल. खासदार संभाजीराजे यांनी केलेल्या आवाहनानुसार शिवभक्तांनी घरात राहून सोहळा साजरा करावा, असे फत्तेसिंह सावंत यांनी सांगितले.

----------------------------------

फोटो: ०४ कोल्हापूर ०२

कोल्हापुरात शुक्रवारी चित्रकार युवराज जाधव यांनी साकारलेल्या शिवछत्रपतींच्या तैलचित्राचे अनावरण युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते न्यू पॅॅलेस येथे झाले. यावेळी शेजारी डावीकडून अभिजीत तिवले, राम यादव, चित्रकार जाधव उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)