शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

‘मातोश्री’वर होणार पंचनामा पक्षनेतृत्व गंभीर : स्थानिकांची एकमेकांवर चिखलफेक

By admin | Updated: May 19, 2014 00:40 IST

संतोष पाटील ल्ल कोल्हापूर कोल्हापुरात दगाफटका झाल्यानेच पराभव झाल्याची भावना शिवसेना नेतृत्वाची झाली आहे. ‘पराभव नेमका कशामुळे झाला’,

 संतोष पाटील ल्ल कोल्हापूर कोल्हापुरात दगाफटका झाल्यानेच पराभव झाल्याची भावना शिवसेना नेतृत्वाची झाली आहे. ‘पराभव नेमका कशामुळे झाला’, याबाबत महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना निकालाच्या संध्याकाळपासूनच ‘मातोश्री’वरून विचारणा होऊ लागली आहे. आता पराभवाची चिकित्सा थेट ‘मातोश्री’वर होणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. स्थानिक नेत्यांनी पराभवाचे खापर एकमेकांवर फोडण्याची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. करवीर निवासिनी अंबाबाईला साकडे घालूनच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी १९९५साली विधानसभेवर भगवा फडकाविला. यानंतर कोल्हापूर भगवामय करण्याचे बाळासाहेबांनी जाहीररीत्या अनेकवेळा बोलून दाखविले होते. निव्वळ गाफीलपणामुळे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने दवडली. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण होता-होता राहिल्याने कोल्हापूरचा पराभव पक्षप्रमुखांच्या जिव्हारी लागला आहे. लोकसभा निकालादिवशी रत्नागिरी-सिंधुदुर्गनंतर उद्धव ठाकरे यांचे कोल्हापूरच्या निकालाकडे लक्ष होते. ‘मातोश्री’वर सकाळपासून कोल्हापूरच्या निकालाचा आढावा घेतला जात होता. निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे कोकणात विजयोत्सव साजरा करण्यासाठी जाण्यापूर्वी कोल्हापूरच्या पराभवाचे कारण जाणण्यास उत्सुक होते. थेट प्रा. मंडलिक यांच्याशी संपर्क करून पराभवाच्या कारणमीमांसेबाबत विचारणाही झाली. एकमेकाला संशयाच्या भोवर्‍यात उभे करीत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांच्यातील कमी झालेली दरी पुन्हा दुप्पट वेगाने दुरावत आहे. निवडणुकीपूर्वीची त्यांच्यातील एकी फक्त दिखावाच असल्याची आता शिवसैनिकांसह मतदारांत चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर ‘मातोश्री’वर होणारी चिकित्सा लोकसभा पराभवासंदर्भात असली तरी त्याचे पडसाद येणार्‍या काळात उमटणार आहेत. जिल्ह्यातील कुरघोडीमुळे विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना नेतृत्व व मतदारांनी धक्कादायक निर्णय घेतल्यास आश्चर्य वाटायला नको, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.