शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीसाठी बाजारपेठा फुलल्या

By admin | Updated: October 21, 2014 23:41 IST

वस्त्रनगरी सज्ज : चायना मालाचे वर्चस्व, करोडो रुपयांची उलाढाल अपेक्षित

इचलकरंजी : येथील वस्त्रनगरी दिवाळीसाठी सज्ज झाली आहे. बाजारपेठेत रंगीबेरंगी आकाशकंदील, शोभेच्या वस्तू, रांगोळी, कपडे यांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. बाजारपेठेत सरासरी वीस टक्क्यांनी महागाईमध्ये वाढ दिसत असून, ७५ टक्के चायना मालाने बाजारपेठेवर वर्चस्व निर्माण केले आहे. निवडणूक निकालानंतर बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी दिसत आहे. तर दिवाळीच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती.इचलकरंजी शहरातील मेन रोडसह जनता चौक, गांधी पुतळा चौक, डेक्कन चौक या परिसरात स्टॉल उभारण्यात आले आहेत. यामध्ये आकर्षक आकाशकंदील, रांगोळी, शोभेच्या वस्तू, पणत्या, मेणबत्या, रंगीबेरंगी हार, लहान मुलांसाठी खेळणी, किल्ल्यावरचे साहित्य, तयार किल्ले, सैनिक यांसह कपड्यांचे स्टॉल यांचा समावेश आहे. कापड मार्केट, बीजेपी मार्केट या परिसरातही कपड्यांची दुकाने सजली आहेत. बाजारपेठेमधील वस्तूंमध्ये सुमारे ७५ टक्के वस्तू चायना मेड आहे. स्थानिक तयार झालेल्या वस्तूंपेक्षा या वस्तूंची किंमत तुलनात्मकरीत्या खूपच कमी असल्याने ग्राहकही त्याकडे आकर्षित होत आहेत. बाजारपेठेमध्ये वीस ते पंचवीस टक्क्यांनी सर्व वस्तूंमध्ये वाढ झाली आहे. वस्त्रनगरीमध्ये मालक व कामगार असे दोन मुख्य वर्ग असल्याने बोनस वाटपानंतरच खऱ्या अर्थाने खरेदीला सुरुवात होते. गत चार दिवसांपासून बोनस वाटप झाल्यामुळे बाजारपेठेत गर्दी फुलू लागली आहे. दरवर्षी दिवाळीला वस्त्रनगरीत करोडो रुपयांची उलाढाल होते. त्या पार्श्वभूमीवर दुकानदारांनी व स्टॉलधारकांनी मोठ्या प्रमाणात माल भरला आहे. (प्रतिनिधी)आजरा बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दीआजरा : पावसाने लावलेली समाधानकारक हजेरी, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुका याचा परिणाम आजरा तालुक्यात दिवाळीच्या खरेदीवर दिसत असून, बाजारात मोठी गर्दी दिसत आहे. प्राधान्याने कपडे, आकाशकंदील, सोन्याचे जिन्नस, खरेदीकरिता मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसत आहे. बहुतांशी सहकारी संस्थांनी सानुग्रह अनुदान व बोनस स्वरूपात कर्मचारी वर्गास दिवाळी भेट दिल्याचा परिणाम बाजारात जाणवत आहे. व्हॉटस अ‍ॅप, फेसबुकवरून खरेदीचा संदेशदेशामधील चायनाची गुंतवणूक कमी व्हावी. त्याचबरोबर देशाला आर्थिक बळकटी मिळावी, यासाठी चायना वस्तू वापरापासून दूर राहा व स्वदेशी वस्तू वापरा आणि पणत्या व दिवाळी शोभेसाठी लागणारे काही साहित्य, फळे या वस्तू रस्त्याकडेला बसलेल्या गरीब व गरजूंकडून खरेदी करा. मोठ्या व्यापारी व दुकानांतून खरेदी करणे टाळून गरजूंना आर्थिक लाभ होईल यासाठी प्रयत्न करा, असे सामाजिक संदेश आजकाल व्हॉटस अ‍ॅप व फेसबुक या सोशल मीडियावरून फिरत आहेत. त्याला काही प्रमाणात प्रतिसादही मिळत असल्याचे दिसत आहे.