शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘मार्केटिंग’मध्ये मराठा समाज मागे

By admin | Updated: August 15, 2014 00:22 IST

नीतेश राणे : मराठा समाजातील मान्यवरांचा सन्मान सोहळा

कोल्हापूर : जिद्द, कष्ट, प्रामाणिकपणा, साहस असे अनेक गुण मराठा समाजात आहेत; परंतु इतर समाजांप्रमाणे स्वत:चे ‘मार्केटिंग’ करण्यात हा समाज कमी पडतो, असे सांगून आरक्षणाचा लाभ घेऊन व्यापार-उद्योग क्षेत्रांत मराठा समाजातील युवकांनी पुढे जावे, असे आवाहन स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे यांनी आज, गुरुवारी येथे केले.राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सह्याद्री फौंडेशन व चव्हाण ग्रुप आॅफ कंपनीज्तर्फे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणाऱ्या मान्यवरांचा महासन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार होते. जिल्हा परिषदेचे सदस्य धैर्यशील माने, सम्राट महाडिक, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी कुलगुरू पवार यांच्या हस्ते स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे, संभाजी ब्रिगेडचे सरचिटणीस शांताराम कुंजीर, ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांचा सत्कार करण्यात आला. राणे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय मंत्री नारायण राणे यांनी घेतला आहे, त्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. मराठा समाजाला आता आरक्षण मिळाले आहे. याचा फायदा उठवीत समाजातील युवकांनी भविष्याकडे वाटचाल करावी. सहसा मराठा समाजात एकजूट पाहायला मिळत नाही; परंतु या ठिकाणी मराठा समाज एकत्र आल्याचे पाहून आनंद वाटत आहे. हे गुण आजच्या युवकांनी आत्मसात करून एकमेकांना हात देण्याचे काम केले पाहिजे.कुलगुरू पवार म्हणाले, सर्वांना बरोबर घेऊन जाण्यासाठी शिक्षण हे माध्यम आहे. यामध्ये समाज मागे पडला तर उन्नती होत नाही. मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाचा निश्चित फायदा आताच्या पिढीला मिळेल. त्याचा त्यांनी लाभ घेण्याची गरज आहे.यावेळी धैर्यशील माने यांचेही भाषण झाले. चव्हाण ग्रुप आॅफ कंपनीज व सह्याद्री फौंडेशन (पुणे)चे अध्यक्ष सतीश चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. चंद्रकांत पाटील यांनी सूत्रसंचालन केले. गुरुबाळ माळी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)