गडहिंग्लज :
एकजूट नसल्यामुळेच मराठा समाज आजवर सर्वच बाबतीत मागे राहिला आहे. त्यामुळे वैयक्तिक आणि समाजाच्या उन्नतीसाठी मराठा बांधवांनी एकत्र यावे, असे आवाहन माजी सभापती अमर चव्हाण यांनी केले.
सकल मराठा समाजातर्फे आयोजित मान्यवरांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रामभाऊ शिवणे गुरूजी होते.
यावेळी संजय गांधी निराधार योजना समितीचे नूतन अध्यक्ष अमर चव्हाण, सदस्य सचिन देसाई, गडहिंग्लज बाजार समिती प्रशासक मंडळाचे सदस्य सुनील शिंत्रे, दिलीप माने, दिग्विजय कुराडे, रोहित मांडेकर व भीमराव राजाराम, ''''संगायो'''' समितीच्या सदस्या ज्योत्स्ना पताडे, गुरूगौरव पुरस्कारप्राप्त प्रा. अनिल कुराडे, रणरागिनी पुरस्कारप्राप्त स्नेहा भुकेले, राष्ट्रवादी शहर महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा सुनीता नाईक यांचा सत्कार झाला.
यावेळी प्रा. शिंत्रे, प्रा. कुराडे, पताडे यांचीही भाषणे झाली. उपाध्यक्ष प्रा. शिवाजीराव भुकेले यांनी सत्कारमूर्तींचा परिचय करून दिला.
यावेळी माजी सभापती विद्याधर गुरबे, तुषार यमगेकर, अरूण जाधव, युवराज बरगे, सचिन मगदुम, यशवंत कोले, प्रकाश तेलवेकर, लक्ष्मण पवार, आप्पा शिवणे, किरण माळवी, मंजुषा कदम, छाया इंगळे, शुभम सावंत, अलका भोईटे, अनंत पाटील, सुभाष कदम, प्रकाश पोवार, महेश पाटील आदी उपस्थित होते.
सकल मराठा समाजाचे अध्यक्ष किरण कदम यांनी प्रास्ताविक केले. शैलेंद्र कावणेकर यांनी सूत्रसंचालन केले. नागेश चौगुले यांनी आभार मानले.
---------------------------------------------------
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे सकल मराठा समाजातर्फे माजी नगराध्यक्षा मंजुषा कदम यांच्याहस्ते ज्योत्स्ना पताडे यांचा सत्कार झाला. यावेळी शिवाजीराव भुकेले, किरण कदम, अमर चव्हाण, रामभाऊ शिवणे आदी उपस्थित होते.
क्रमांक : २११२२०२०-गड-०१