शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

‘माणुसकी’च्या दातृत्वाने गहिवरल्या ‘भिंती’

By admin | Updated: October 28, 2016 23:47 IST

देणाऱ्यांचे हात हजारो : दुसऱ्या दिवशीही करवीरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; अनेकांच्या चेहऱ्यावर कपडे मिळाल्याचा आनंद

कोल्हापूर : एका दिलाची व एका विचाराची माणसे एकत्र येऊन चांगला उपक्रम राबवू शकतात, हे ‘माणुसकीची भिंत’ या उपक्रमाने सिद्ध केले आहे. सामाजिक दायित्व हरवत चाललेल्या या काळात अजूनही काही चांगल्या मनाची व सामाजिक भान असलेली माणसे आहेत, याची साक्ष पटवून देत शहरातील सीपीआर चौक, कसबा गेट परिसरातील भिंती ‘माणुसकी’च्या दातृत्वाने गहिवरल्या. शहरातील या उपक्रमाला करवीरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जुने-नवे कपडे, ड्रेस, स्वेटर्स, ब्लेझर्स, पॅँट्स, कुर्ते, जीन्स, लहान मुलांचे कपडे, साड्या, कानटोपी, स्कार्फ, शूज, मोजे, चप्पल, स्लिपर्स ‘माणुसकीच्या भिंती’वर आणून ठेवल्या. गुरुवार (दि. २७) पासून सुरू असलेल्या या उपक्रमात ‘देणाऱ्याचे हात हजारो’ याची प्रचिती येत आहे. हजारो कपड्यांचे जोड या ठिकाणी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आणून दिले आहेत. सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत अनेकजण इथून कपडे घेऊनही जात आहेत. या ठिकाणी गरजू, गरीब लोकांना आपल्याला हवे ते कपडे, हवे तितके घेऊन जाण्याची मुभा असल्याने गर्दी होत आहे. आपल्यासह आपल्या कुटुंबीयांसाठी कपडे घेऊन जाण्यासाठी अनेक ांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. मनाजोगे कपडे मिळाल्याच्या आनंदाने त्यांचे चेहरे खुलत आहेत. फक्त जुनेच कपडे न देता अनेक दानशूर नागरिकांनी नवे कपडेदेखील या उपक्रमासाठी दान केले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान व आनंद पाहणे हा खूप आल्हाददायक क्षण असल्याचे मत या उपक्रमात सहभाग घेणाऱ्यांनी व्यक्त केले.कसबा गेट येथे कसबा तरुण मंडळ, कॉर्नर मित्रमंडळाचे कार्यकर्ते तसेच ‘स्वाभिमान’चे जिल्हाध्यक्ष सचिन तोडकर यांनीही ‘माणुसकीची भिंत’ उभारली आहे. या ठिकाणीही दातृत्वाचे अनेक हात समोर आले असून, ड्रेस, खेळणी, शूज, साड्या, जीन्स, आबालवृद्धांसाठीचे कपड्यांचे ढीग लागले आहेत. या उपक्रमासाठी प्रशांत पाटील, महेश कोठावळे, रसिक पेटकर, शिवानंद तोडकर, उदय नार्वेकर, राजन डोंगरसाने, अभिजित तोडकर, गायत्री राऊत, रवींद्र पेटकर हे स्वयंसेवक म्हणून काम पाहत आहेत. हा उपक्रम मंगळवार (दि. १) पर्यंत सुरू राहणार आहे. (प्रतिनिधी)आपले योगदान अमूल्य आहेआपल्या घरी अनेक वस्तू, कपडे जे आपण वापरत नसतो; किंबहुना वाढत्या वयाप्रमाणे त्याची मापे बदलतात, असे ड्रेस, कपडे पडून राहतात. लहान मुलांची खेळणी, वस्तूही अशाच मुले मोठी झाली की अडगळीत टाकल्या जातात. अशा वस्तू, कपडे आपण या ‘माणुसकीच्या भिंती’वर आणून दिल्यास आनंदाच्या क्षणापासून वंचित असलेल्या गोरगरिबांच्या मुलांना त्या उपयोगी पडतील. इतके योगदान आपण नक्कीच देऊ शकतो.