शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

सक्तीने बंद पाडली मंडई, बॅरिकेट्स लावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:23 IST

कोल्हापूर : भाजी विक्रीसाठी मंडईतच बसण्याचा आग्रह विक्रेत्यांनी धरल्यामुळे शुक्रवारी सकाळी कपिलतीर्थ भाजी मंडईत महापालिका कर्मचारी आणि विक्रेते यांच्यात ...

कोल्हापूर : भाजी विक्रीसाठी मंडईतच बसण्याचा आग्रह विक्रेत्यांनी धरल्यामुळे शुक्रवारी सकाळी कपिलतीर्थ भाजी मंडईत महापालिका कर्मचारी आणि विक्रेते यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. सुमारे दोन तासाच्या वादावादीनंतर पालिका कर्मचाऱ्यांनी मंडईचे सर्व मार्ग बॅरिकेट्स लावून बंद केले.

कोल्हापूर शहरात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. भाजीसह सर्वच जीवनावश्यक वस्तू या विक्रेते व दुकानदारांनी घरपोच देण्याच्या आहेत. दुकानात तसेच रस्त्यावर, मंडईत बसून विक्री करता येणार नाही, असा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. गुरुवारी त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु शुक्रवारी मात्र कपिलतीर्थ मंडईतील विक्रेत्यांनी त्यास जोरदार विरोध केला.

विक्रेत्यांनी मंडईत बसूनच भाजी विक्री करण्याचा आग्रह धरला. त्यांनी आपली विक्रीही सुरू केली. परंतु त्याची माहिती कळताच महापालिकेची पथके त्याठिकाणी पोहोचली. उपायुक्त शिल्पा दरेकर, शहर अभियंता नारायण भोसले, इस्टेट विभाग प्रमुख सचिन जाधव, अतिक्रमण विभाग प्रमुख पंडित पोवार हेही त्याठिकाणी पोहोचले. तुम्हाला मंडईत बसून भाजी विक्री करता येणार नाही, असे त्यांनी विक्रेत्यांना सांगितले. परंतु विक्रेते काही ऐकायला तयार नव्हते.

आमच्यामुळेच कोरोना होतो का? आम्ही लांब लांब बसून भाजी विक्री करताेय, असे विक्रेते सांगत होते. माजी नगरसेवक अजित ठाणेकर, संदीप वीर, राजू जाधव यांनीही विक्रेत्यांची बाजू घेतली. बरीच वादावादी झाली. विक्रेत्यांच्या या भूमिकेमुळे लक्ष्मीपुरीतील भाजी विक्रेते, फळे विक्रेतेही रस्त्यावर आले आणि त्यांनी व्यवसाय सुरू केले. विक्रेते ऐकत नाहीत म्हटल्यावर महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्तीने भाजी मंडई बंद केली. तसेच मंडईत जाणारे रस्ते चारी बाजूने बॅरिकेट्‌स लावून बंद केले. तसेच स्पीकरवरून मंडई बंद असल्याचे वारंवार सांगण्यात आले. त्यामुळे दिवसभर ही मंडई बंद राहिली.

लक्ष्मीपुरीतील भाजी मंडई पोलिसांनी बंद पाडली. फळे विक्रेते, भाजी विक्रेते यांच्यासह काही दुकाने उघडी होती, तीही बंद करण्यास भाग पाडले. भाजी मंडईत बसणाऱ्या विक्रेत्यांकडे गल्लोगल्ली जाऊन फिरून भाजी विक्री करण्याची यंत्रणा नाही. त्यांच्याकडे चारचाकी वाहन अथवा रिक्षा नाहीत. त्यामुळेच मंडईत बसून नियमांचे पालन करून भाजी विकतो, अशी त्यांची मागणी आहे.