शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

‘मलेरिया प्रतिरोध महिना’ बासनात

By admin | Updated: June 7, 2016 07:32 IST

महापालिका प्रशासन सुस्त : उपनगरांत हिवताप, मलेरियासह साथीच्या रोगांचा प्रार्दुभाव

अमर पाटील --कळंबा -पावसाळ्यात उद्भणाऱ्या हिवताप, मलेरिया, डेंग्यू, अतिसार, यांसह अन्य साथीच्या रोगांच्या जनजागृतीसाठी  १ जूनपासून राज्यभर ‘मलेरिया प्रतिरोध महिना’ साजरा केला जातो. विविध माध्यमांतून या साथीच्या जनजागृतीचा प्रसार, प्रसिद्धी केली जाते; परंतु उपनगरात साथीच्या रोगांनी थैमान घातले असतानाच पालिकेचा आरोग्य विभाग मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमाच्या जनजागृतीपासून अलिप्त व सुस्त असल्याचे चित्र आहे.उपनगरातील कचरा उठावातील अनियमिततेने अस्ताव्यस्त कचरा, पसरलेले कोंडाळे, सांडपाण्याचा प्रश्न, औषध फवारणीतील अनियमितता, उपनगरांतील नाले सफाईकडे कित्येक वर्षे पालिका प्रशासनाने केलेली डोळेझाक, यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी परिसरात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच साथीच्या रोगांचा फैलाव होतो. हिवताप, डेंग्यूसह अन्य साथीच्या आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळतात.गतवर्षी उपनगरांत हिवतापाच्या रुग्णांची संख्या जास्त होती. वर्षभर अतिसाराचे रुग्ण आढळत होते. साथीच्या रोगांबाबतच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना आखतानाच या साथींबाबात पालिका आरोग्य विभागाकडून तेवढीच जनजागृती करणे महत्त्वाचे आहे.१ जूनपासून संपूर्ण राज्यभर हिवताप प्रतिरोध महिना साजरा होत असताना पालिकेच्या आरोग्य विभागातील हिवताप विभागच या मोहिमेपासून दूर असल्याचे चित्र आहे.विभागाकडून कोणतीच प्रसिद्धी प्रचार यंत्रणा राबवली नाही. अशा हालचालीही नाहीत. पावसाळा सुरू होऊन रोग पसरल्यावर या विभागाच्या हालचालींना वेग येणार का? की आरोग्य विभाग साथीच्या रोगांच्या प्रतीक्षेत आहे का, अशा नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. दक्षिणच्या उपनगरांची भौगोलिक रचना उंच-सखल असल्याने ४५ एकर उतारावरून कचरा मिश्रित पाणी कसेही वाहत नागरी वस्तीत शिरते. त्यामुळे तपोवन, रायगड कॉलनी, सुर्वेनगर, साळोखेनगर प्रभागातील नागरी वस्त्यांत पाणी तुंबते व साथीचे आजार थैमान घालतात.आज उपनगरातील बऱ्याच प्रभागांचा ना स्वतंत्र ले आऊट, ना ड्रेनेजलाईन विकसित, ना सांडपाणी निर्गतीकरणाच्या गटारी विकसित, त्यामुळे पावसाळ्यात सखल भागात पाणी तुंबून आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कचरा उठाव व औषध फवारणीतील अनियमिततेने भरीस भर पडल्याने उपनगरांचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येऊन साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. किमान यावर्षी तरी नालेसफाई करून, औषध फवारणी व कचरा उठावात नियमितता ठेवून नागरिकांचे सार्वजनिक आरोग्य सशक्त ठेवावे, ही मागणी जोर धरत आहे.