शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांचा ‘मेंटेनन्स’ महापालिकेच्या माथी

By admin | Updated: May 13, 2016 00:57 IST

रस्ते विकास प्रकल्प : शासनाने झटकले हात; ‘आयआरबी’सोबतचा करार रद्द करण्यास टाळाटाळ

विश्वास पाटील -- कोल्हापूर -कोल्हापुरात आयआरबी कंपनीने केलेल्या वादग्रस्त रस्ते प्रकल्पातील ४९ किलोमीटरच्या रस्त्याचा देखभाल-दुरुस्ती खर्च महापालिकेनेच करावा, असा प्रयत्न आता चक्क राज्य शासनाकडूनच सुरू आहे. रस्ते प्रकल्पाच्या करारानुसार ही जबाबदारी आयआरबी कंपनीची आहे. ते करणार नसतील तर विकासक म्हणून राज्य रस्ते विकास महामंडळाने ही जबाबदारी घ्यायला हवी परंतु या दोघांनाही त्यातून बाजूला काढून महापालिकेनेच हा खर्च करावा, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. त्यामुळे टोलमधून सुटका झालेल्या शहरवासीयांची रस्त्यांची देखभाल नीट न झाल्यास नवी डोकेदुखी सुरू होणार आहे. टोल प्रकल्पाची किंमत म्हणून शासनाने ४५९ कोटी रुपये ‘आयआरबी’ कंपनीस देण्याचा निर्णय घेतल्यावर ४ फे ब्रुवारी २०१६ ला टोल रद्द करण्यात आल्याची अधिसूचना शासनाच्या नगरविकास विभागाने काढली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्याची येथे पत्रकार परिषद घेऊन घोषणाही केली. त्यानंतर कोल्हापूरकरांनी टोल रद्द केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कारही केला. त्यानंतर गेल्या चार दिवसांपूर्वी राज्य रस्ते विकास महामंडळाने ‘रस्ते आहेत त्या स्थितीत ताब्यात घ्यावेत,’ असे पत्र महापालिकेस दिले. हे करत असताना राज्य सरकारने त्यामध्ये मुद्दाम एक त्रुटी ठेवली. टोल रद्द झाला व त्याचे पैसे सरकार देणार असूनही शासनाने आयआरबी सोबतचा करार रद्द केल्याचे अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. कारण या करारातील ‘कलम ३९’ नुसार ज्यादिवशी करार रद्द होईल त्या दिवसापासून पुढील तीन वर्षे रस्त्यांचा देखभाल-दुरुस्ती खर्च आयआरबी कंपनीने करावा, असा स्पष्ट उल्लेख आहे. करार रद्द केल्याचे जाहीर केल्यास करारातील तरतुदीनुसार कंपनीस पुढील तीन वर्षे देखभाल करावी लागेल अथवा देखभालीचा खर्च त्यांच्या रकमेतून वजा करावा लागेल. हा मूळ करार आयआरबी व राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यामध्ये झाला आहे. महापालिका फक्त ‘कन्फर्मिंग पार्टी’ आहे. त्यामुळे कंपनी देखभाल-दुरुस्ती करणार नसेल तर विकासक म्हणून राज्य रस्ते विकास महामंडळाची ही जबाबदारी आहे. करारानुसार कंपनीस दिलेला टेंबलाईवाडी येथील तीन लाख चौरस फुटांचा भूखंड महामंडळाने आपल्याकडे ठेवून घेतला आहे; परंतु रस्त्यांच्या देखभालीबद्दल मात्र महामंडळ अंग झटकून टाकत असल्याचे दिसते आहे व त्यास राज्य शासन पाठीशी घालत आहे. ‘तुमचे टोलचे पैसे भागवले, आता देखभालीचे तुमचे तुम्ही बघा,’ असेच सरकारचे म्हणणे आहे म्हणूनच करार रद्द झाल्याशिवाय तसेच सचिव पातळीवर अपूर्ण कामांविषयी निर्णय झाल्याशिवाय ‘आयआरबी’ने केलेले रस्ते ताब्यात घेण्यास महानगरपालिकेने स्पष्ट नकार दिला आहे. यासंदर्भात सचिव पातळीवर बैठक व्हावी, असे महापालिका प्रशासनाचे प्रयत्न आहेत. त्यामुळे टोल रद्द झाला तरी त्यानंतरची दुखणी कायम आहेत.