शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

महिपतराव बोंद्रे यांचे निधन

By admin | Updated: June 16, 2014 00:52 IST

कोल्हापूर शहरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार होते सुरू

कोल्हापूर : कोल्हापूरच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील रांगडे व्यक्तिमत्त्व, श्री शाहू शिक्षण संस्थेचे चेअरमन, कृषिभूषण महिपतराव बोंद्रे (पापा) (वय ८७) यांचे आज, रविवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते गेले पंधरा दिवस कोल्हापूर शहरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज दुपारी अडीच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. माजी कृषी राज्यमंत्री स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रे यांचे लहान बंधू, तर माजी महापौर सई खराडे यांचे वडील व ‘गोकुळ’चे माजी संचालक व शाहू शिक्षण संस्थेचे सचिव चंद्रकांत बोंद्रे यांचे ते चुलते होत. महिपतराव बोंद्रे यांना गेली अनेक वर्षे श्वसनाचा त्रास (दमा) होता. अलीकडील सहा महिन्यांत हा त्रास वाढल्याने ते घरीच असायचे. पंधरा दिवसांपूर्वी त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना आज दुपारी अडीच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. दुपारी पावणेचार वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी श्री शाहू शिक्षण संस्थेच्या पटांगणात ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांच्या शिवाजी पेठेतील निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. शहरासह जिल्ह्यातील चाहत्यांनी बोंद्रे यांचे अंत्यदर्शन घेतले. शिवाजी पेठेतून रात्री पावणेआठ वाजता अंत्ययात्रा पंचगंगा स्मशानभूमीत पोहोचली. रात्री आठच्या दरम्यान त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेश क्षीरसागर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, माजी आमदार सुरेश साळोखे, हिंदकेसरी दादू चौगले, उद्योगपती आर. एम. मोहिते, माजी महापौर शिवाजीराव कदम, विक्रम जरग आदी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात भारती विजयसिंह डोंगळे (घोटवडे), शामला सूर्यकांत खाडे (सांगरूळ), सरोजिनी नितीन शिंदे (पलूस), सई अजित खराडे (कोल्हापूर) या मुली तर चंद्रकांत बोंद्रे, रणजित बोंद्रे, विजय बोंद्रे, पंडितराव बोंद्रे व महादेव बोंद्रे हे पुतणे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी, (दि.१८) आहे. (प्रतिनिधी)