शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

युतीच्या प्रतिसादानंतरच ‘महायुती’

By admin | Updated: July 26, 2014 00:17 IST

विधानसभेची रणनीती : राजू शेट्टी यांची भूमिका

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुती आकारास आली, कारण त्यावेळी जागा मर्यादित होत्या. परंतु विधानसभा निवडणुकीत २८८ जागा असल्याने शिवसेना-भाजपचा प्रतिसाद कसा मिळतो, यावरच महायुती आकारास येणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता ते बोलत होते.शेट्टी यांनी सांगितले, ‘महायुतीबाबत यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याशी दोन-तीनवेळा बोलणे झाले आहे. आज मुंबईत शिवसेना व भाजपची बैठक झाली. युतीचा गेल्या पंधरा वर्षांतील जागा वाटपाचा फॉर्म्युला बदलावा, अशी मुख्यत: भाजपची मागणी आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्याने वाढीव जागा हव्या आहेत. त्यामुळे कुणी किती जागा लढवायच्या हे या दोन पक्षांत ठरल्याशिवाय पुढे जाता येत नाही. त्यांच्या जागा निश्चित झाल्यावर या दोन पक्षांनी स्वाभिमानी, रासप व आठवले गटाला किती जागा सोडायच्या याचा निर्णय होईल. या दोन पक्षांची त्यासंदर्भात आज प्राथमिक चर्चा झाली आहे. परंतु त्याचा तपशील समजलेला नाही. त्यांच्याकडून काय प्रस्ताव येतो हे समजल्यावरच आमची रणनीती ठरवू. आम्ही पक्ष म्हणून विधानसभेसाठी किती जागा हव्यात, याची मागणी अद्याप या पक्षांकडे केलेली नाही. परंतु आम्ही स्वबळावर लढायचेच झाल्यास किती जागांवर लढू शकू याची चाचपणी करून ठेवली आहे. त्यानुसार राज्यांतील किमान ६५ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पाच जागांवर लढण्याची तयारी आहे. त्यासंदर्भातील चाचपणी म्हणूनच उद्या, शनिवारी कोल्हापुरात व रविवारी (दि.२७) गारगोटी (ता. भुदरगड) येथे ‘स्वाभिमानी’चा मेळावा होत आहे. (प्रतिनिधी)