शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

महाडिकांची भिस्त भरमूअण्णांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 00:20 IST

नंदकुमार ढेरे । लोकमत न्यूज नेटवर्क चंदगड : पक्षीय राजकारणापेक्षा गटाच्या राजकारणासाठी प्रसिद्ध असलेल्या चंदगड तालुक्यात २००९ व २०१४ ...

नंदकुमार ढेरे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंदगड : पक्षीय राजकारणापेक्षा गटाच्या राजकारणासाठी प्रसिद्ध असलेल्या चंदगड तालुक्यात २००९ व २०१४ च्या लोकसभा निवडणुकीचा मागोवा घेतल्यास दोन्ही निवडणुकीत मंडलिक बाप-लेकांना तालुक्यातील मतदारांनी आघाडी दिली आहे. तर ही आघाडी मोडून काढण्यासाठी खासदार धनंजय महाडीक यांची खरी भिस्त आहे ती माजी मंत्री भरमूअण्णा पाटील यांच्यावरच.तालुक्यात पक्षीय राजकारणापेक्षा व्यक्तिनिष्ठ राजकारण चालते हे सर्वश्रुत आहे. तालुक्यात प्रा. मंडलिक यांनी प्रचाराचा सपाटा लागला आहे. तर महाडीक यांच्यासाठी भरमूअण्णा व आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी पायाला भिंगरी बांधली आहे. मात्र विचित्र राजकीय परिस्थिती निर्माण झाल्याने कुणाला पाठिंबा द्यायचा या संभ्रमावस्थेत कार्यकर्ते आहेत.तालुक्यात काँगे्रस, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा या पक्षांचा मताचा गठ्ठा कायम आहे. भरमूअण्णा व तालुका संघाचे अध्यक्ष राजेश पाटील हे काँगे्रसमध्ये कार्यरत आहेत. माजी आमदार महादेवराव महाडीक यांनी काँगे्रस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून राजेश पाटील यांना ‘गोकुळ’मध्ये संचालकपद दिले आहे. मात्र, शिवसेनेचे उमेदवार मंडलिक हे राजेश यांचे मेव्हुणे असल्याने त्यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.जिल्हास्तरावर गढूळ झालेल्या राजकीय परिस्थितीची लागण चंदगड तालुक्यातही झाली आहे. भरमूअण्णा यांनी खासदार महाडीक यांचा प्रचार सुरू केला असून ते तालुका पिंजून काढत आहेत. आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून ते महाडीकांसाठी जीवाचे रान करतील पण याचे फळ त्यांना विधानसभा निवडणुकीत मिळणार का ? हे येणारा काळच ठरविणार आहे.महादेवराव महाणिक व आमदार सतेज पाटील यांनाही मानणारे कार्यकर्ते तालुक्यात आहेत. महाडिक यांनी महिन्यापूर्वी कार्यकर्त्यांच्या गाठी-भेटी घेतल्या आहेत. सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांना संपर्कात ठेवण्यासाठी यंत्रणा राबविली आहे.तालुक्यात मंडलिक यांच्या प्रचारार्थ गोपाळराव पाटील, नामदेव पाटील, प्रभाकर खांडेकर, संग्राम कुपेकर, सुनिल शिंत्रे, शांता जाधव, श्वेता नाईक तर महाडीक यांच्यासाठी सभापती बबन देसाई, उपसभापती विठाबाई मुरकुटे, दीपक पाटील, ज्योती पाटील, सचिन बल्लाळ, शांताराम पाटील, भैरू खांडेकर, दयानंद काणेकर, अरूण पिळणकर, बाबूराव हळदणकर, अजित व्हन्याळकर, मायाप्पा पाटील ही मंडळी उतरली आहेत. मात्र, तालुक्यात राष्ट्रवादीला युवा कार्यकर्त्यांची कमतरता जाणवत आहे. स्वाभिमानीचे कार्यकर्ते प्रचारात दिसत नाहीत.जि. प. सदस्यांच्या भूमिकेकडे लक्षमहादेवराव यांच्यामुळे ‘गोकुळ’चे संचालकपद मिळालेले राजेश पाटील हे शिवसेनेचे मंडलिक यांचे मेहुणे असल्याने ते मेहुण्यांना मदत करणार की महाडिक यांचा प्रचार करणार याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे. जि.प. सदस्य अरूण सुतार हे राजेश पाटील यांचे समर्थक असल्याने त्यांचीही भूमिका पाटील यांच्या भूमिकेवरच अवलंबून आहे. जि.प.सदस्य कल्लाप्पा भोगण व विद्या पाटील हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले आहेत. मात्र, सत्ता स्थापनेत विकास निधी व अन्य कारणासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा देऊन त्यांच्याकडून निधीही मिळविला आहे. त्यामुळे भोगण व पाटील पक्षादेश मानणार की पाटील यांच्या शब्दाला जागणार याबाबत संदिग्धता आहे.