शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस महानिरीक्षकांनी जाणल्या ‘मॅक’च्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:22 IST

कसबा सांगाव : विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी येथील कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीला व ‘मॅक’ला मंगळवारी सकाळी ...

कसबा सांगाव : विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी येथील कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीला व ‘मॅक’ला मंगळवारी सकाळी सदिच्छा भेट दिली. यावेळी ‘मॅक’चे अध्यक्ष गोरख माळी यांनी त्यांचे स्वागत केले आणि औद्योगिक वसाहतीमधील समस्यांचे निवेदन त्यांना दिले.

पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांनी समस्या मांडल्या. त्यामध्ये संस्थेमार्फत देण्यात आलेल्या गाडीमधून पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये पेट्रोलिंगचे कामकाज नियमितपणे सुरू ठेवावे, कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पोलीस ठाणे उभारणीसाठी मिळालेल्या भूखंडावर पोलीस ठाणे लवकरात लवकर सुरू करावे, लक्ष्मी टेकडी येथे अपघात होऊ नये याकरिता सकाळी व सायंकाळी वाहतूक पोलीस यांची नियुक्ती करण्यात यावी, कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील अतिक्रमण काढण्यात यावे, संस्थेमार्फत देण्यात आलेल्या पोलीस चौकीमध्ये नियमितपणे कर्मचारी वर्ग असावेत. कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये सीसीटीव्ही बसविणे, कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतींमधील अवैध धंदे बंद करावेत, कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील पेट्रोलिंग विशेषत: सोमवारी सुटीदिवशी मोठ्या प्रमाणात करण्यात यावे. कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये स्क्रॅप व इतर साहित्य गोळा करण्याकरिता येणाऱ्या महिलांना एमआयडीसीमध्ये येणे बंद करावे, कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील घडत असलेले गुन्हे, अपघात व इतर बाबींची नोंद गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे येथे नोंद करून घेण्यात यावी. वरील उद्योजकांच्या असणाऱ्या समस्या ‘मॅक’च्या माध्यमातून मनोजकुमार लोहिया यांच्यासमोर मॅकचे अध्यक्ष गोरख माळी, उपाध्यक्ष संजय पेंडसे, संचालक हरिश्चंद्र धोत्रे, मोहन कुशिरे, मुबारक शेख, प्रवीण पराळे, डकरे व इतर मान्यवर सभासद बंधूंनी मांडल्या.

मनोजकुमार लोहिया, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मॅकच्या उपस्थित मान्यवर सभासदांशी सविस्तरपणे चर्चा केली व उद्योजकांचे विषय सोडविण्यासाठी नक्कीच प्रयत्न करीन, असे सांगितले. तसेच उद्योजक व कामगार बंधूंच्या समस्यांबाबत नेहमीच पोलीस कार्यालयाचे सहकार्य राहील, असे सांगितले.

या बैठकीस अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, करवीरचे पोलीस उपाधीक्षक आर. आर. पाटील, कागलचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, गोकुळ शिरगावचे पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर, उपाध्यक्ष संजय पेंडसे, संचालक हरिश्चंद्र धोत्रे, मोहन कुशिरे, प्रताप परुळकर, स्वि. संचालक अमृतराव यादव, निमंत्रित सदस्य कुमार पाटील, शिवाजी भोसले, संगमेश पाटील, मुबारक शेख, तसेच मान्यवर सभासद जयराज पाटील, विजय कोंडाळकर, प्रवीण पराळे, विजयन रमेश, चंद्रकांत खोत, डकरे आदी मान्यवर उपस्थित होते. आभार मॅकचे उपाध्यक्ष संजय पेंडसे यांनी मानले.