शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या मदतीशिवाय एकरकमी ‘एफआरपी’ अशक्य

By admin | Updated: December 1, 2015 00:45 IST

शेतकऱ्यांची कोंडी : आश्वासन दिल्यानुसार अद्याप बैठकच न झाल्याने कारखान्यांपुढे पेच

कोल्हापूर : राज्यातील साखर उद्योगासमोर एकरकमी ‘एफआरपी’ वरून पेच निर्माण झाला असताना सरकारच्या पातळीवर काहीच हालचाली दिसत नाहीत. ‘एफआरपी’चा पेच सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनापूर्वी बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते, पण अद्याप बैठक झाली नसल्याने कोंडी वाढत चालली आहे. बाजारातील साखरेचे दर, बँकांची उचल पाहता सरकारच्या मदतीशिवाय एकरकमी एफआरपी देणे कारखानदारांना अशक्य आहे, हे मात्र निश्चित आहे. ‘एफआरपी’ ठरविताना साखरेचा दर ३२०० रुपये गृहित धरली. सध्या साखरेचा दर बाजारात २४२० ते २५०० रुपये प्रतिक्ंिवटल आहे. त्यामुळेच हा पेच निर्माण झाला आहे. साखर मूल्यांकनाच्या राज्य बँक ८५ टक्क्यांप्रमाणे उचल देते. सध्याचे साखर मूल्यांकन २२७० रुपये आहे. त्यातील ८५ टक्के म्हणजे १९३० रुपयेच पोत्यामागे कारखान्यांना मिळणार आहेत. त्यातील प्रक्रिया व पूर्वहंगाम कर्जाचे हप्ते वजा जाता ११८० रुपयेच हातात राहणार आहेत. त्यामध्ये उताऱ्याप्रमाणे वाढ होणार असली तरी एकंदरीत कोल्हापूर जिल्ह्यातील साखर उतारा पाहता १६०० ते १७०० रुपये पहिली उचल देणे शक्य आहे.एकरकमी एफआरपी द्यायची म्हटले तर उर्वरित ७०० ते ८०० रुपये सरकारच्या मदतीशिवाय देणे सध्या तरी शक्य नसल्याचे चित्र आहे. केंद्राने साखर निर्यातीची सक्ती केली आहे. साखर निर्यात झाल्यानंतर बाजारातील साखरेचे दर वाढल्यास कारखान्यांच्या हातात चांगले पैसे येतील. त्यानंतर उर्वरित रक्कम देता येऊ शकते. हातात पैसे नसल्याने कारखानदार अडचणीत असले तरी शेतकरी त्यापेक्षा अधिक संकटात आहेत. केंद्र सरकारने खतांसह सर्व बाबींवरील अनुदान हळू-हळू कमी केल्याने उत्पादनखर्च डोक्याच्या वर गेला आहे. शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी हातात मिळाली तरच त्यांचे संसाराचे गणित जमणार आहे. कारखानदार व शेतकरी दोन्ही पेचात असताना सरकारने बघ्याची भूमिका घेण्याऐवजी मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. हंगाम सुरू होऊन महिना उलटला तरी शेतकऱ्यांच्या हातात एक रुपयाही पडलेला नाही. त्यामुळे ‘एफआरपी’चा गुंता वाढत असताना सरकार मात्र गप्प दिसत आहे. निम्मे उपाशीच...!गतवर्षी कारखान्यांनी ओढून-ताणून एकरकमी एफआरपी दिली. हंगामाच्या पहिल्या दोन महिन्यांत गाळप झालेल्या शेतकऱ्यांनाच पैसे मिळाले पण त्यानंतर ऊस पाठविलेल्या शेतकऱ्यांना सहा महिने पैशांविना उपाशी राहावे लागले होते. यावर्षी तसे न करता सर्वच शेतकऱ्यांना पैसे देण्याची मानसिकता कारखानदारांची दिसते.