शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वीकृत’सह समिती सदस्य निवडीला ‘खो’

By admin | Updated: December 1, 2015 00:15 IST

महापालिका : आचारसंहितेमुळे विभागीय आयुक्तांकडे मार्गदर्शन मागविले

कोल्हापूर : महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्य तसेच स्थायी, परिवहन, शिक्षण व महिला बालकल्याण समितीवरील सदस्य निवडी विधानसभा निवडणूक आचारसंहितेत अडकल्या आहेत. महानगरपालिका निवडणुका होऊन एक महिना झाला तरी या समित्या अस्तित्वात आलेल्या नाहीत. त्यामुळे त्याचा महानगरपालिकेच्या कामकाजावर परिणाम होणार आहे. या सदस्य निवडी घ्याव्यात का, याबाबत नगरसचिव कार्यालयाने विभागीय आयुक्त कार्यालयाकडे मार्गदर्शन मागविले आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक १ नोव्हेंबरला पार पडली. त्यानंतर नवीन सभागृह १५ नोव्हेंबरला अस्तित्वात आले. नवीन सभागृहात महापौर-उपमहापौर निवडी झाल्या. महानगरपालिकेचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी स्थायी समिती, परिवहन समिती, शिक्षण मंडळ समिती तसेच महिला व बालकल्याण समिती अस्तित्वात येणे आवश्यक आहे. नगरसचिव विभागाने या समित्यांवरील सदस्य निवडीसाठी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने सभा घेण्याची तयारी केली होती. तोपर्यंत विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक जाहीर झाली. त्यामुळे आचारसंहिता लागू झाली असताना अशी सभा घेता येते का, हा वादाचा प्रश्न तयार झाला. शेवटी मनपा नगरसचिव तथा सहायक आयुक्त उमेश रणदिवे यांनी याबाबत विभागीय आयुक्त यांच्याकडून मार्गदर्शन मागविण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्र त्यांनी पाठविले आहे. मात्र, अद्याप त्याचे उत्तर आलेले नाही. त्यामुळे विविध समित्यांच्या सदस्य निवडी तसेच स्वीकृत सदस्य निवडीचा कार्यक्रम अनिश्चित झाला आहे. निवडणूक आचारसंहितेचा परिणाम म्हणून सदस्य निवडींना ‘खो’ बसला असल्याने या अनुषंगाने होणाऱ्या इच्छुकांच्या हालचाली थंड पडल्या आहेत. कोणतीच चर्चा अथवा हालचाली नसल्याने समित्यांच्या इच्छुकांनी आपल्या ‘तलवारी म्यान’ केल्या आहेत. (प्रतिनिधी) कामकाजावर मर्यादामहानगरपालिकेच्या विविध समित्यांचे कामकाज नियमित सुरू न झाल्यामुळे काही अडचणी निर्माण होत आहेत. स्थायी समिती सभेत प्रत्येक आठ दिवसांनी आर्थिक धोरणांशी संबंधित निर्णय घेतले जातात; पण ही समितीच अस्तित्वात न आल्याने समितीच्या कामकाजावर मर्यादा आल्या आहेत.