शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

जगणं कुलूपबंदसाठी : विश्वास पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : माणसाच्या आयुष्यात एखादे वर्ष असे येते की सारे जीवनच उलटे-पालटे होऊन जाते. संकटामागून संकटे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : माणसाच्या आयुष्यात एखादे वर्ष असे येते की सारे जीवनच उलटे-पालटे होऊन जाते. संकटामागून संकटे येतात आणि माणूस हतबल होऊन जातो. तसाच अनुभव सरत्या वर्षाने कोल्हापूरसह साऱ्या जगाला दिला. त्यामुळे सरलेल्या वर्षाचे नावही नको, अशीच भावना प्रत्येकाच्या मनात त्याला निरोप देताना दाटून आली आहे. या वर्षाने माणसाचे जगणंच कुलूपबंद करून टाकले.

जवळची माणसे होत्याची नव्हती झाली, नोकऱ्या गेल्या, आर्थिक संकट अंगावर आले. हजार-दोन हजार किलोमीटरचे अंतर, डोक्यावर संसार व खांद्यावर पोराबाळांना घेऊन लोक पायपीट करत गेले. जीवलगांना महिनोन‌्महिने भेटता आले नाही. वृत्तपत्रांतील व वृत्तवाहिन्यांच्या बातम्यांनीही लोकांना भीती दाखवली. पर्यावरण स्वच्छ झाले, खून, मारामाऱ्या, अपघात कमी झाले. या काही चांगल्या घटना घडल्या, तरी माणसाच्या जीवनात हे वर्ष काळामिट्ट अंधारच घेऊन आले; पण त्या अंधारातही माणूस जगला, उद्या तरी काही चांगले घडेल या आशेवर... नवा दिस घेऊन नव्या वर्षात सूर्य उगवणार आहे. त्याच्या पोटात नक्कीच चांगले काही असेल, त्याचे स्वागत करुया...

मृत्यूने उडवला थरकाप

मागच्या वर्षात कोरोनाच्या महामारीत रोजच्या बघण्यातील लोकांचा मृत्यू पाहण्याची वेळ अनेकांवर आली. सरपंच, नगरसेवक, महसूल, आरोग्य, पोलीस कर्मचाऱ्यांपासून ते सामान्य व्यक्तींपर्यंत शेकडो लोकांचा या काळात मृत्यू झाला. कोरोनाच्या आजारापेक्षा त्याच्या भीतीनेच अनेकांचा थरकाप उडवला. सामाजिक हानी होईल, अशी अनेक चांगली माणसे कोरोनाने आपल्यातून हिरावून नेली. फक्त सर्दी-खोकला झाला म्हणून तपासणीसाठी स्वत: चालत रुग्णालयात आलेल्या लोकांचे मृतदेहही त्यांच्या घरापर्यंत पोहोचला नाहीत. निळ्या प्लास्टिकच्या आवरणात गुंडाळलेला मृतदेह पाहणेही जीवघेणे ठरले. अंत्यसंस्काराचा विधी नाही, रक्षाविसर्जन नाही की नैवेद्य नाही. कावळा नाही, भावकी नाही की बारावे नाही. हे सगळे त्या कोरोनामुळे घडले.

निधन वृत्ताचाही धसका

पंचगंगा स्मशानभूमी दिवसरात्र अंत्यस्ंस्कारांच्या ज्वालांनी धगधगत राहिली. दहनासाठी शेणी कमी पडल्या. त्या देण्यासाठी अशा संकटातही कोल्हापूर पुढे धावून आले. ‘लोकमत’मध्ये प्रसिध्द होणाऱ्या निधनाच्या बातम्या वाचून लोकांच्या पोटात धस्स होत असे. त्यामुळे अनेक वाचकांनी कृपा करून या बातम्या प्रसिध्द करू नका, अशी विनंतीही केली..