शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

‘साहित्य’ क्रांती घडविणारे माध्यम

By admin | Updated: February 12, 2015 00:26 IST

राजा शिरगुप्पे : चिंचवाड येथे सहावे ग्रामीण युवा मराठा साहित्य संमेलन

गांधीनगर : लेखन किंवा साहित्य हे आपल्याला रक्ताशिवाय क्रांती घडविण्यासाठी मिळालेले माध्यम आहे. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून हे हत्यार शोषितांच्या व वंचितांच्या हातात जाण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक राजा शिरगुप्पे यांनी केले. ते चिंचवाड (ता. करवीर) येथे सहाव्या ग्रामीण युवा मराठा साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्षपदावरून बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत, अ‍ॅड. गोविंदराव पानसरे यांनी केले. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील उपस्थित होते.पानसरे म्हणाले, साहित्य आणि सत्य यांच्या बाबतीत अनेक प्रश्न निर्माण होतात. सत्य, आणि साहित्याची भूमिका काय असावी, हा प्रश्न आहे. केवळ एकमत किंवा एक विचार दृष्टिकोन यांचा प्रसार आणि प्रचार करून स्वतंत्र विचाराला पायबंद घालणे हे आपण नैतिक मानतो का? स्वागताध्यक्ष दीपक मगदूम, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील ‘जितो’चे अध्यक्ष नेमिचंद संघवी, सागर चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रामीण कथाकार शंकर पाटील, कविवर्य आबा पाटील, उपप्राचार्य मनोहर परीट, वैशाली पाटील, संतोष माने व सनतकुमार पाटील यांचा गौरव झाला. तसेच कमल पाटील लिखित ‘वेलीवरचे फुल’ व ‘मोहाचे जाळे’ या नाट्य एकांकिका प्रकाशित झाल्या. दुपारच्या सत्रात शिक्षण उपसंचालक मकरंद गोंधळी यांनी ‘आसुही हसले खुदुखुदु’ याचे सादरीकण केले. काव्यसंध्याच्या सत्रात संमेलनाध्यक्ष कवी बाळासोा शेटे यांच्या अध्यक्षतेखालील कवी संमेलनात आबा पाटील, संजय सौंदलगे, के. ए. मगदूम, उमेश सुतार, शर्मिष्ठा पाटील, आदी कवी सहभागी झाले होते. रात्री सृजनशक्ती बालविकास मंदिर या शाळेच्या विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला. एस. डी. पाटील यांनी प्रास्ताविक, तर व्ही. डी. देसाई, सीमा बोरगावे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी चिंतामणी मगदूम, अंकित सुतार, सचिव नयना पाटील, सुनीता पाटील, आप्पासोा पाटील, रावसोा खोत, श्रेणिक पाटील, आर. ए. चौगुले, के. ए. मगदूम, मुकुंद मांडरेकर, आदी उपस्थित होते.