शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम देण्यासाठी आयुष्य: राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 00:54 IST

हुपरी : सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळवून देण्यासाठीच आपण आयुष्यभर प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठीच साखर कारखानदारांच्या मांडीला मांडी ...

हुपरी : सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळवून देण्यासाठीच आपण आयुष्यभर प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठीच साखर कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून आपण बसत असतो. शेतकरी हिताविरोधी आपण कधीही भूमिका घेतलेली नसून माझ्या मिशीला आजपर्यंत कधीही खरकट लागलेले नाही. त्यामुळेच आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नी अगदी खुल्यापणाने सातत्याने रोखठोक भूमिका घेत असतो, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले.हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाचे उमेदवार राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ हुपरी (ता.हातकणंगले) येथील हुतात्मा शंकर चिटणीस चौकात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. काँग्रेस पक्षाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचा सत्कार माजी खासदार जयवंतराव आवळे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले, या भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे समाजातील एकही घटक समाधानी नाही. अन्न सुरक्षा योजना चुकीच्या पद्धतीने राबवून गोरगरीब जनतेच्या चुलीत पाणी ओतण्याचे व बेरोजगारी वाढवून तरुणांचे आयुष्य बरबाद करण्याचे काम सरकारने केले आहे. या सत्ताधुंद सरकारला घराकडे पाठविण्याची वेळ आता आली आहे.माजी खासदार जयवंतराव आवळे म्हणाले, कोल्हापूर जिल्हा व पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. मात्र, आपल्यातल्या अंतर्गत मतभेदांनीच विरोधकांना मोठे करण्याचे काम केले आहे. आता यापुढे एकमेकांच्या पायात पाय न घालता हातात हात घालून पुढे जाण्याचे काम आपणा सर्वांना करावे लागणार आहे. नूतन जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष आता नव्याने उभारी घेऊ लागला आहे. यापुढील सर्व निवडणुका आपण जिंकून काँग्रेस पक्षाची ताकद वाढवूया, असे आवाहन यावेळी केले.स्वागत व प्रास्ताविक राजूबाबा आवळे यांनी केले. यावेळी राजेश पाटील बी. के. चव्हाण, बाबासाहेब दबडे, सासने, प्रकाश पाटील, आप्पासाहेब एडके, नूरमहम्मद मुजावर, रेवती पाटील, संभाजी पोवार आदींनी मनोगते व्यक्त केले. विलासराव गाताडे, बाबासाहेब चौगुले, राहुल आवाडे, किरण पोतदार, बाळासाहेब जाधव, जालिंदर पाटील, नानासाहेब गाट, आदी यावेळी उपस्थित होते.नातवाचा नाद सोडून शेट्टी यांच्याबरोबरतत्कालीन खासदार बाळासाहेब माने यांचे जुने सहकारी संभाजी पोवार एक जुनी आठवण सांगताना म्हणाले, मानेसाहेबांच्या मनामध्ये सर्वसामान्य शेतकºयांच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा तीव्र होती. त्यांची इच्छापूर्ती करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम खासदार राजू शेट्टी यांनी खºया अर्थाने पूर्ण केले आहे. त्यामुळेच आपण त्यांच्या नातवाचा नाद सोडून शेतकºयांसाठी आपले आयुष्य वेचणाºया खासदार राजू शेट्टी यांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.