शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

‘जातपडताळणी’कडून १ जूनपासून दाखले

By admin | Updated: May 25, 2015 00:37 IST

पारदर्शक व उच्चांकी पडताळणी : किमान पाच हजार दाखल्यांचे वाटप होणार

कोल्हापूर : कोल्हापूरसह सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांच्या जातपडताळणीच्या सुमारे पाच हजार प्रकरणांची छाननी युद्धपातळीवर सुरू आहे. यामध्ये सर्वाधिक प्रकरणे विद्यार्थ्यांची आहेत. सेवाविषयक अर्जांनाही प्राधान्य दिले जात आहे. आॅगस्टपर्यंत आणखी प्रलंबित प्रकरणे मार्गी लागतील, अशी माहिती विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्र. २चे सदस्य भालचंद्र मुळे यांनी ‘लोकमत’ला दिली. १ जून २०१५ पासून दाखले वाटपाचे काम सुरू होणार आहे. ‘एसएमएस’द्वारे हे सूचित केले जाणार असल्याने अर्जदारांनी परस्पर कार्यालयाशी संपर्क साधू नये, असे आवाहन मुळे यांनी केले आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र (बार्टी)च्या सहकार्याने समितीकडून प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष निपटारा मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. समितीकडून शैक्षणिक व सेवाविषयक प्रकरणांची युद्धपातळीवर छाननी सुरू आहे. पात्र व परिपूर्ण अर्ज असलेल्या अर्जदारांना वैधता प्रमाणपत्राचे वाटप महिनाअखेरपासून सुरू केले जाणार आहे. सर्व सेवा व शैक्षणिकविषयक अर्जदारांना छाननी पूर्ण होताच एसएमएसद्वारे सूचित केले जाणार आहे. छाननीची प्रक्रिया जलद व पारदर्शकपणे निरंतर सुरू राहणार आहे. वेळेत दाखले देण्याचा समितीचा प्रयत्न आहे. तरी अर्जदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुळे यांनी केले आहे. अर्जदारांनी त्या वेबसाईटमधील दिलेल्या व्ही. सी. नंबर व लॉट नंबरची माहिती व जातीचा मूळ दाखला, तसेच आपले मूळ ओळखपत्र घेऊन १ जूननंतर वैधता प्रमाणपत्र घेण्यासाठी जातपडताळणी कार्यालयात यावे. वैध ठरलेल्या अर्जदारांनी ओळखपत्र, जातीचा मूळ दाखला, आदी कागदपत्रांच्या छायांकित प्रतींसह उपस्थित राहून प्रमाणपत्र घ्यावे, असे आवाहन मुळे यांनी केले. (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांना वेळेत वैधता प्रमाणपत्रे देणारतत्काळ आवश्यकता असलेल्या शैक्षणिक व सेवांसाठीच्या दाखल्यांना प्राधान्य दिले जात आहे. सर्वच प्रलंबित दाखल्यांची छाननी होणार आहे. कार्यालयाशी थेट संपर्क न साधता एमएमएस व संकेतस्थळावरील सूचनांची वाट पाहावी. जातपडताळणी कार्यालयात छाननीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने विशेषत: विद्यार्थ्यांनी काळजी करू नये. वैधता प्रमाणपत्र वेळेत दिले जाईल, असे समिती सदस्य भालचंद्र मुळे यांनी सांगितले.