शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

गांधीनगर प्रादेशिक नळपाणी योजनेला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:38 IST

उचगाव : गांधीनगरसह १३ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या गांधीनगर प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीला सरनोबतवाडीजवळच्या मॅकडोनाल्ड्स हॉटेलजवळ गेल्या ...

उचगाव : गांधीनगरसह १३ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या गांधीनगर प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीला सरनोबतवाडीजवळच्या मॅकडोनाल्ड्स हॉटेलजवळ गेल्या सहा महिन्यांपूर्वी गळती लागली आहे. मात्र, विद्युत विभाग व प्राधिकरण यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने ही गळती अजूनही काढली नसल्याने रोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. या गळतीमुळे यातील बहुतांश गावांत अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईची मोठी झळ सोसावी लागत आहे. सिद्धनेर्ली येथील दूधगंगा नदीवरून गांधीनगरसह १३ गावांसाठी गांधीनगर प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. या योजनेला सरनोबतवाडीजवळच्या मॅकडोनाल्ड्स हॉटेलजवळ गळती लागली. मात्र, जलवाहिनीला अडसर ठरलेल्या विद्युत डीपीमुळे गळती काढणे कठीण झाले आहे.

या ठिकाणची गळती काढण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी खुदाई करून ठेवली आहे. जवळच विद्युत डीपी असल्याने खुदाई करणे व गळती काढणे धोक्‍याचे बनले आहे. त्यामुळे गळती काढण्याचे काम तात्पुरते थांबविले आहे. परिणामी रोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. यामुळे उचगाव, गांधीनगर या मोठ्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. विद्युत विभाग व प्राधिकरण यांच्यामध्ये समन्वय नसल्याने हे गळती काढण्याचे काम पुढे सरकलेले नाही. गळतीमुळे उचगाव, गडमुडशिंगी, गांधीनगर, मणेरमळा भागांत पाणीपुरवठा अपुरा होत असल्याने टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्युत विभाग, संबंधित ग्रामपंचायत व जीवन प्राधिकरण यांच्या एकत्रित समन्वयाने यावर तोडगा काढून ही गळती काढावी अशी मागणी होत आहे.

..........................

चौकट

नवीन वाहिनी कार्यान्वित करणे गरजेचे

सदरची मुख्य वाहिनी ही २० वर्षांपूर्वीची असल्याने तिचे आयुष्यमान संपले आहे. यामुळे प्रादेशिक योजनेच्या जलवाहिनीला वारंवार अनेक ठिकाणी गळती लागत असून नवीन डक्टलाईन आयर्नच्या वाहिनीचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, ती वाहिनी कार्यान्वित करणे गरजेचे बनले आहे.

कोट

गळती काढण्यासाठी जलवाहिनीजवळच्या विद्युत डीपीचा अडथळा आहे. कामे करताना विद्युत डीपीच्या वीजप्रवाहामुळे धोका आहे. या कारणामुळे गळती काढण्याचे काम थांबविले आहे. ग्रामपंचायत व विद्युत विभाग यांनी सहकार्य करावे.

- ए.डी. चौगुले

उपअभियंता

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

ही योजना १३ गावांची आहे. उचगावसारख्या ५० हजार लोकसंख्येच्या गावाला या योजनेतून पाणीपुरवठा होतो. जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे पाणीपुरवठा अपुरा होत आहे. गळती काढण्याची जबाबदारी पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करावा.

- दीपक रेडेकर, शिवसेना, उचगाव

फोटो १५ गांधीनगर पाणीपुरवठा

ओळ : सरनोबतवाडी (ता. करवीर) येथील मॅकडोनाल्ड्स हॉटेलजवळ गांधीनगरच्या नळपाणी योजनेला गळती लागून लाखो लिटर पाणी वाया जात आहे.

छाया : मोहन सातपुते