शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

'एलबीटी'प्रश्नी आज मुख्यमंत्र्यांची भेट

By admin | Updated: December 16, 2014 00:40 IST

कोल्हापूर महापालिकेच्या तिजोरीत ‘एलबीटी’मधून १ एप्रिल ते ६ डिसेंबर २०१४ अखेर ५५ कोटी २६ लाख ११ हजार ७९९ रुपये जमा

कोल्हापूर : स्थानिक संस्था कर अर्थात ‘एलबीटी’ हा जाचक कर रद्द व्हावा, महापालिकेकडून व्यापाऱ्यांवर सुरु असलेल्या कारवाईप्रश्नी उद्या, मंगळवारी ‘फेडरेशन आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र’ (फाम)चे अध्यक्ष मोहन गुरनानी यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथे भेटणार आहे. दरम्यान, कोल्हापूर महापालिकेच्या तिजोरीत ‘एलबीटी’मधून १ एप्रिल ते ६ डिसेंबर २०१४ अखेर ५५ कोटी २६ लाख ११ हजार ७९९ रुपये जमा झाले आहेत.राज्यातील भाजप सरकारने ‘एलबीटी’ घालविण्याचे आश्वासन दिले होते. दुसरीकडे, विनापर्याय ‘एलबीटी’ रद्द करावा अथवा मूल्यवर्धित कर (व्हॅट)मध्ये एक ते दीड टक्का वाढीची मागणी व्यापारी करीत आहेत. सरकार मात्र ‘एलबीटी’ऐवजी ‘टर्न ओव्हर टॅक्स’आणूया का, या विचारात आहे. परंतु, व्यापाऱ्यांचा नवीन करप्रणाली विरोध आहे. गुरनानी, सांगलीचे खासदार संजय पाटील व नागपूरचे दीपेन अग्रवाल यांचे शिष्टमंडळ उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे कोल्हापूर व्यापारी व उद्योजक महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगावकर यांनी सांगितले.(प्रतिनिधी) अडीच लाखांचा दंड; ५० व्यापाऱ्यांची बँक खाती सील‘एलबीटी’ न भरल्याप्रकरणी व्यापाऱ्यांकडून महापालिकेने सुमारे अडीच लाख रुपये जमा केले आहेत, तर ५० व्यापाऱ्यांची बँक खाती सील केली आहेत. आता २५० व्यापाऱ्यांना नोटिसा काढल्या आहेत. त्याची २३ व २४ डिसेंबरला सुनावणी होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.‘जीएसटी’ला आणखी दोन वर्षे वाट पाहावी लागणार ? देशात एकच कर असावा, त्यासाठी वस्तू व सेवा कर (जीएसटी) २०१६ ला लागू करू, असे केंद्र सरकारने सांगितले होते; पण त्याची अंमलबजावणी दोन वर्षे लांबण्याच्या शक्यतेमुळे व्यापारी बुचकळ्यात पडले आहेत.