शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मीपुरीतील बाजार पाण्यात

By admin | Updated: July 11, 2016 01:12 IST

भाजीविक्रेत्यांची तारांबळ : पावसाचे पाण्यात गटारीचे पाणी मिसळले

कोल्हापूर : पावसाचे पाणी घुसल्याने लक्ष्मीपुरी मंडईतील आठवडी बाजारामध्ये रविवारी विक्रेते आणि ग्राहकांची तारांबळ उडाली. यात गटारींचे सांडपाणीही मिसळल्याने काहीशी दुर्गंधी पसरली होती. फळ व भाजीपाला मार्केट आज, सोमवारपासून बेमुदत बंद राहणार आहे. ते लक्षात घेऊन भाजीपाल्याचे नुकसान होऊ नये म्हणून पावसाच्या साचलेल्या पाण्यातच विक्रेत्यांनी स्टॉल लावले होते. लक्ष्मीपुरीमध्ये दर रविवारी बाजार भरतो. याठिकाणी भाजीसह धान्य, मसाला, फळे, आदी स्वरूपांतील खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होते. सकाळपासून पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे नेहमीपेक्षा ग्राहकांची गर्दी कमी होती. मात्र, सकाळी दहाच्या सुमारास अचानकपणे मंडईत पावसाचे पाणी साचू लागले. सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटारी नसल्याने तसेच अस्तित्वात असलेल्या गटारी कचऱ्याने तुंबल्याने पावसाचे तसेच या गटारींमधील पाणी तुंबून रस्त्यांवरून वाहू लागले. पावसाच्या सातत्यामुळे या पाण्याचा लोट वाढला. यात काही विक्रेत्यांच्या भाजीचे व अन्य मालाचेही नुकसानही झाले. पाण्याचा निचरा होत नसल्याने ते रस्त्यांवरच साचून राहिले. या साचलेल्या पाण्यात सांडपाण्याचाही समावेश झाल्याने काहीशी दुर्गंधी पसरली. अशा पाण्यातच विक्रेत्यांनी स्टॉल लावून भाजीविक्री सुरू ठेवली होती. साचलेल्या दुर्गंधीयुक्त व अस्वच्छ पाण्यातून वाट काढत ग्राहकांकडून खरेदी सुरू होती. पावसापासून बचावासाठी विक्रेत्यांनी प्लास्टिकचे कागद, ताडपत्र्या लावल्या होत्या. दिवसभरातील भरपावसात या ठिकाणी मंडई भरली होती. कपिलतीर्थ मार्केट, गंगावेश, आदी ठिकाणच्या मंडईतही काहीशी अशीच स्थिती दिसून आली. पावसामुळे ग्राहकांची मंडर्इंमध्ये तुरळक गर्दी दिसून आली. (प्रतिनिधी) बावड्यातही भर पावसात आठवडा बाजारात गर्दी कसबा बावडा येथेही रविवारी आठवडा बाजार असतो. दिवसभर पाऊस सुरू असला तरी भाजी आणि फळ विक्रेते नेहमी प्रमाणे आले होते. पाऊस थांबायचे नाव घेत नव्हता. त्यामुळे पावसातच छत्र्या, रेनकोटसह नागरिकांनी बाजार खरेदीसाठी गर्दी केली होती.