शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

उशिरा आलेले परीक्षार्थी पेपरला मुकले

By admin | Updated: April 30, 2017 18:52 IST

केंद्रीय चयन आयोगाची परीक्षा; विवेकानंद ज्युनिअर कॉलेज केंद्रावरील प्रकार

आॅनलाईन/लोकमतकोल्हापूर, दि. ३0 : उशिरा आलेल्या परीक्षार्थींना केंद्रीय चयन (निवड) आयोगाच्या (स्टाफ सिलेक्शन) पेपरला मुकावे लागले. विवेकानंद ज्युनिअर कॉलेजच्या केंद्रावर रविवारी हा प्रकार घडला. शहरातील विविध १७ केंद्रांवर दोन सत्रांत एकूण ५३८४ उमेदवारांनी परीक्षा दिली.

मल्टी टास्किंग या अतांत्रिकपदाच्या भरतीसाठी केंद्रीय चयन आयोगातर्फे परीक्षा आयोजित केली होती. आयोगाने कोल्हापुरातील शहरामधील स. म. लोहिया हायस्कूल, प्रिन्सेस पदमाराजे गर्ल्स हायस्कूल, न्यू हायस्कूल, विवेकानंद ज्युनिअर कॉलेज, न्यू मॉडेल इंग्शिल मेडियम स्कूल, विद्यापीठ हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज, विद्यापीठ हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज, शहाजी महाविद्यालय, राजर्षी शाहू महाराज हायस्कूल, गोखले कॉलेज, महावीर महाविद्यालय, उषाराजे गर्ल्स हायस्कूल, न्यू कॉलेज, गर्ल्स हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज, शहाजी लॉ कॉलेज, देशभूषण विद्यामंदिर हायस्कूल, नागोजीराव पाटणकर हायस्कूल या केंद्रावर सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुपारी २ ते ४ या दोन सत्रात परीक्षा घेतली.

यातील सकाळच्या सत्रातील पेपरसाठी ९ ते ९.३० ही वेळ परीक्षार्थींना परीक्षा हॉलमध्ये सोडण्याची होती. मात्र, विवेकानंद ज्युनिअर कॉलेजच्या केंद्रावर निर्धारित वेळ संपल्यानंतर पावणेदहाच्या सुमारास काही परीक्षार्थी दाखल झाले. यात चंदगड, आजरा, भुदरगड, राधानगरी, आदी परिसरातील परीक्षार्थींचा समावेश होता. त्यांनी पेपरसाठी परीक्षा हॉलमध्ये सोडविण्यात यावे अशी मागणी येथील केंद्र प्रमुख आणि परीक्षेचे कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांना केली.आयोगाच्या नियमानुसार निर्धारित वेळ संपल्याने त्यांना आत सोडण्यात आले नाही. त्यामुळे त्यांना या पेपरला मुकावे लागले.

दरम्यान, याबाबत संबंधित परीक्षा केंद्राचे प्रमुख आणि शाहूवाडीचे गटविकास अधिकारी उदय पाटील यांच्याशी संपर्क साधला. यावर त्यांनी सांगितले की, आयोगाने परीक्षार्थींना परीक्षा हॉलमध्ये सोडविण्याची वेळ सकाळी ९ ते ९.३० अशी निर्धारित केली होती. त्याची माहिती आयोगाने प्रवेश पत्रावर देखील दिली आहे. असे असताना काही परीक्षार्थी पावणेदहा वाजता केंद्राबाहेर आले. त्यांनी परीक्षा हॉलमध्ये सोडण्यात यावी अशी मागणी केली. निर्धारीत वेळेत परीक्षा हॉलमध्ये आलेल्या परीक्षार्थींना सकाळी साडेनऊ वाजता उत्तरपत्रिकांचे वाटप केले होते. उशिरा आलेल्या परीक्षार्थींना आयोगाच्या नियमानुसार परीक्षा हॉलमध्ये सोडता आले नाही. (प्रतिनिधी) नोंदणीपैकी निम्मे परीक्षार्थ्यांची दांडी

कोल्हापूर केंद्रावरुन या परीक्षेतील दोन्ही सत्रांसाठी ६०४८ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी पहिल्या पेपरसाठी २६९४ परीक्षार्थी हजर, तर ३३५४ जण गैरहजर राहिले. दुसरा पेपर २६८९ परीक्षार्थींनी दिला, तर ३३५९ जणांनी दांडी मारली. या परीक्षेसाठी १७ केंद्रावर जिल्हा प्रशासनाचे ७०० कर्मचारी कार्यरत होते. दरम्यान, सहाय्यक वाहतूक निरीक्षकपदासाठी शहरातील काही केंद्रांवर परीक्षा झाली.