शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

किरवले यांना अखेरचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2017 00:25 IST

कोल्हापुरात अंत्यसंस्कार : सीबीआय चौकशी करा : रामदास आठवले

कोल्हापूर : ‘अमर रहे, अमर रहे, किरवले सर अमर रहे’ अशा घोषणांनी आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक डॉ. कृष्णा किरवले यांच्यावर शनिवारी सायंकाळी पंचगंगा स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गावरून त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीवर निळ्या झेंड्यात गुंडाळून त्यांचे पार्थिव ठेवले होते. अंत्ययात्रेत त्यांची पत्नी कल्पना, मुलगी अनघा यांच्यासह केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, ज्येष्ठ विचारवंत डॉ. गंगाधर पानतावणे, ‘श्रमुद’चे डॉ. भारत पाटणकर यांच्यासह साहित्यिक, आंबेडकर चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ. कृष्णा किरवले (रा. म्हाडा कॉलनी, राजेंद्रनगर) यांची शुक्रवारी दुपारी त्यांच्या कोल्हापुरातील घरात गळा चिरून हत्या करण्यात आली. आर्थिक व्यवहाराच्या कारणांतून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर दलित चळवळीतील नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा जनक्षोभ उसळला होता. या हत्येचा सर्वबाजूंनी तपास करावा अशी संतप्त कार्यकर्त्यांची मागणी होती. शनिवारी सकाळी डॉ. किरवले यांच्या मृतदेहाचे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये (सीपीआर) विच्छेदन करण्यात आले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास येथील दसरा चौकातून डॉ. किरवले यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेत ‘अमर रहे, अमर रहे; किरवले सर अमर रहे’अशा घोषणा देण्यात येत होत्या. अंत्ययात्रा बिंदू चौकात शोकसभेत अनेकांची आदरांजलीपर भाषणे झाली. पंचगंगा स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार केले. अंत्ययात्रेत आमदार सतेज पाटील, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, पार्थ पोळके, व्यंकाप्पा भोसले, मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक, उत्तम कांबळे, शहाजी कांबळे, डॉ.विश्वनाथ शिंदे, आदी सहभागी झाले. (प्रतिनिधी)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून करण्याची मागणी करणार आहोत. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा करावी, तसेच या मागील मुख्य सूत्रधार शोधण्यात यावा.-रामदास आठवले, केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री. बाबांच्या हत्येमागे व्यक्तिगत कारण नक्कीच नाही. गुरुवारी रात्री मी बाबांशी पुण्यातून फोनवरून बोलले. त्यांच्या बोलण्यावरून घरगुती कारण नक्कीच नाही, ते शुक्रवारी (दि. ३) रात्री नाशिकला जाणार होते. तोपर्यंतच त्यांची हत्या झाली.- अनघा किरवले, मुलगीपाच तास ठिय्याडॉ. किरवले यांच्या मारेकऱ्याला अटक करावी, या मागणीसाठी दलित कार्यकर्त्यांनी शनिवारी पाच तास सीपीआर परिसरात ठिय्या आंदोलन केले. विशेष पोलिस महानिरीक्षकांनी संशयित प्रीतम पाटील आणि त्याच्या आईला अटक केल्याची माहिती दिल्यानंतर हा तणाव निवळला.