लाटवडे (ता. हातकणंगले) येथील हनुमान विकास सेवा संस्था, पार्वती महिला सहकारी दूध संस्था, हिंदुराव पाटील दूध संस्था, हिंदुराव पाटील पतसंस्था, हिंदुराव पाटील चॅरिटेबल फाउंडेशन या संस्थांच्या ऑनलाइन वार्षिक सभेत ते बोलत होते. सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. पार्वती हॉल येथे सभा झाली.
दूध उत्पादकांना बिनव्याजी ॲडव्हान्स, म्हैस तसेच गाय खरेदीसाठी एक वर्ष मुदतीचे बिनव्याजी कर्ज तत्काळ दिले जाते. शेतकऱ्यांना विकास संस्थेतून विविध योजनेतून अल्प व्याजात कर्ज दिले जाते. फाउंडेशनच्या माध्यमातून दवाखाना सुरू आहे, अशी माहितीही शंकर पाटील यांनी दिली. योगेश चौगुले, विजय पाटील यांनी अहवाल वाचन केले. स्वागत अमर निरुखे यांनी केले. पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत पाटील, हनुमान विकास संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांची भाषणे झाली. सभेस राजाराम साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शिवाजीराव पाटील, उज्ज्वला पाटील, बी. आर. पाटील, सुरेश पाटील, मोक्तिक पाटील, सचिन कोळी, आदी उपस्थित होते. आभार नीलेश पाटील यांनी मानले.
फोटो ओळी - लाटवडे येथील विविध संस्थांच्या सभेत संस्थापक शंकर पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अमर निरुखे, वसंत पाटील, उज्ज्वला पाटील, श्रीकांत पाटील, सचिन कोळी उपस्थित होते.