शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

लसीसाठी मोठी सुई; वेस्टेजमुळे पळता भुई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:28 IST

कोल्हापूर : कोरोना आजार प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून एडी सिरिंजचा पुरवठा केला जातो; पण अलिकडे जिल्हा प्रशासनास त्याचा पुरवठा ...

कोल्हापूर : कोरोना आजार प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून एडी सिरिंजचा पुरवठा केला जातो; पण अलिकडे जिल्हा प्रशासनास त्याचा पुरवठा कमी होत आहे. यामुळे स्थानिक आरोग्य प्रशासनास डोस इतके हे सिरिंज मिळत नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परिणामी लसीकरणावेळी सिरिंजची टंचाई प्रकर्षाने जाणवत आहे.

कोरोना लसीचे डोस सरकारकडून आठवड्यातील तीन दिवस जिल्ह्याला मिळत आहेत. एकावेळी जास्तीत जास्त एक लाखांपर्यंतही डोस मिळाले आहेत. डोस इतके सिरिंज केंद्र सरकारकडून उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. यामुळे शहर, जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात सिरिंजसाठी धावाधाव करावी लागत आहे. लसीकरणासाठी एडी सिरिंजचा वापर केल्यास कमी वेदना होतात. याउलट इतर स्थानिक बाजारपेठेतून मोठ्या आकाराची सिरिंज खरेदी करून त्याचा वापर केल्यास वेदना अधिक होतात; पण लस मोफत असल्याने कितीही वेदना झाल्या तरी त्या सहन केल्या जातात.

१) काय आहे एडी सिरिंज?

एडी सिरिंजचा वापर एकदाच केला जातो. त्याचा पुन्हा वापर करता येत नाही. शरीराला टोचून बाहेर काढल्यानंतर ती लॉक होते. यामुळे सिरिंजचा गैरवापरही करता येत नाही. या सिरिंजचा वापर लहान मुलांच्या लसीकरणासाठी केला जातो. याला एडी सिरिंज असे म्हणतात. इतर सिरिंजप्रमाणे कोणत्याही आकारात ती मिळू शकते.

२) २ सीसी सिरिंज कशी असते?

दोन सीसी सिरिंज म्हणजे २ मिलीमीटर सिरिंज. यामधून दोन मिलीमीटर वेगाने लस शरीरात जावू शकते. याचा वापर कोरोनासह इतर लसीकरणासाठी केला जातो. ही सिरिंज कोणत्याही आकाराची असते.

३) जिल्ह्याला रोज किती लागतात सिरिंज?

कोरोना लसीकरणासाठी शहरात रोज अधिकाधिक चार हजार तर जिल्ह्यात ४० हजार सिरिंज लागतात. दोन महिन्यांपूर्वी लसीचे डोस कमी मिळत होते; पण सध्या आठवड्यातून तीन दिवस लस मिळते. एकावेळी ७० हजार ते लाखांपर्यंत लसीचे डोस उपलब्ध होत आहेत. इतक्या मोठ्या संख्येने डोस मिळाल्यानंतर लसीकरणावेळी एडी सिरिंजची टंचाई निर्माण होते.

४) वेस्टेज वाढले

एडी सिरिंजचा वापर पुन्हा करता येत नसल्याने त्याचा कचरा होतो. एकदा वापरली की ती टाकून दिली जाते. असे शहर आणि जिल्ह्यात रोज २० ते २५ हजार सिरिंजचा कचरा निर्माण होतो. तो वैद्यकीय घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाला दिला जातो.

५) जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याचा कोट

एडी सिरिंजचा पुरवठा केंद्र सरकारकडून होतो. सध्या लसीच्या डोसची संख्या अधिक आणि एडी सिरिंजची संख्या कमी अशी स्थिती आहे. एडी सिरिंज एकदाच वापरावी लागते.

डॉ. फारूक देसाई, जिल्हा लस समन्वय अधिकारी.