शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

अपुरा निधी अन् प्रभागाचा व्याप मोठा

By admin | Updated: February 13, 2015 00:56 IST

ड्रेनेज लिंकिंग रखडले : सर्व सुविधा सानेगुरूजी वसाहतीत हव्यात; सर्व्हिस रोड असणारा एकमेव प्रभाग

कोल्हापूर : शहराचे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे उपनगर असणाऱ्या सानेगुरुजी वसाहत प्रभागामध्ये अंतर्गत रस्ते, ड्रेनेजअंतर्गत पाईपलाईन तयार असूनही मुख्य वाहिनीची जोडणी लांबल्याने ड्रेनेजची समस्या काही प्रमाणात तोंड वर काढू लागली आहे. याचबरोबर शहराप्रमाणेच दवाखाना, क्रीडांगण आणि बहुतांशी नागरी सुविधा मिळाव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होते. या प्रभागात क्रशर चौक, बीडी कामगार चाळ, शिवराम पोवार कॉलनी, राजोपाध्येनगर, दत्त महाराज कॉलनी, सूर्यवंशी कॉलनी, नंदिनी रेसिडेन्सी, देवणे कॉलनी, शिरगावकर कॉलनी, राधाकृष्ण कॉलनी, इंद्रप्रस्थ कॉलनी, शांतीवन, हनुमान तरुण मंडळ परिसर, डायना पार्क, काशीद कॉलनी, जोतिबा मंदिर परिसर, आदी मोठे क्षेत्र आहे. प्रभागात मागील निवडणुकीवेळी सात हजार मतदार होते. त्यात नव्याने वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे उपनगर असल्याने नवनवीन होणाऱ्या वसाहती व अपार्टमेंटमुळे अंतर्गत गटारी, रस्त्यासाठी निधी मंजूर करून आणताना नगरसेवकांची मोठी दमछाक होते. शहरातील नागरिकांना मिळणाऱ्या सर्व प्राथमिक सोयीसुविधा या प्रभागातही मिळाव्यात, अशी माफक अपेक्षा आहे. पूर्वी कचऱ्याचा उठाव वेळोवेळी होत नव्हता. मात्र, नगरसेवकांच्या जागरूकतेमुळे ही समस्याही मिटली. अंतर्गत रस्ते, गटारी नसल्याने पावसाळ्यात काही भागांत चिखलाचे साम्राज्य तयार होते. प्रभागाचा आवाका मोठा असल्याने काही भागांचा विकास लवकर, तर काही भागांचा विकास वेळाने होत आहे. याशिवाय काही भागांतील मोठे रस्ते खासगी जागांमुळे डांबरीकरणाअभावी रखडले आहेत. प्रभागात मंजूर असलेली बागही पूर्ण करण्याची मागणी होत आहे. याशिवाय डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळोवेळी डासप्रतिबंधक औषधांची फवारणी करण्याची मागणीही नागरिकांतून होत आहे. बोंद्रेनगर रिंगरोड येथे जाण्यासाठी राधानगरी रोड ते गंगाई लॉन येथे मोठा रस्ता झाला, तर नागरिकांचा तीन किलोमीटरचा फेरा वाचणार आहे. त्यामुळे हा रस्ता व्हावा, अशी मागणीही जोर धरत आहे. भौगोलिक रचनेमुळे ड्रेनेजची उंची अधिक व रस्ते तीव्र उताराचे झाले आहेत. यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून गाडी चालविणे दूरच पायी चालणेही मुश्कील होत आहे. माझ्या प्रभागाच्या विकासासाठी मी महापालिका व नगरोत्थान आणि माजी मंत्री सतेज पाटील यांच्या निधीतून मोठा विकास निधी मंजूर करून आणला आहे. त्यातून रस्ते, गटार, ड्रेनेज, बाग, दवाखाना, बॅडमिंटन कोर्ट, बॉक्सिंग रिंग, आदी कामे पूर्णत्वाकडे नेत आहे. यापुढेही काही महिन्यांनी नगरसेवकपदाचा कार्यकाल संपला तरी काही कामे आधीच मंजूर करून ठेवल्याने ही कामे यापुढेही सुरूच राहतील. आजही प्रभागाच्या विकासाला अधिक महत्त्व दिले आहे. यापुढेही देत राहू. - शारंगधर देशमुख, नगरसेवक