शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचे लॅपटॉप सदस्य, सभापतींच्या घरी

By admin | Updated: June 13, 2017 01:13 IST

प्रशासनाची विनंती कचऱ्याच्या टोपलीत : ८१ पैकी केवळ १७ जणांनीच केले परत

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क--कोल्हापूर : गेल्या सभागृहातील ६९ जिल्हा परिषद सदस्य आणि १२ पंचायत समित्यांचे सभापतींना दिलेले लॅपटॉप अजूनही त्यांनी जिल्हा परिषदेत जमा केलेले नाहीत. हे लॅपटॉप परत देण्याबाबत आणि ते जमा करून घेण्याबाबत विषय समिती सभापतींच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, ८१ पैकी केवळ १७ जणांनीच लॅपटॉप परत केले आहेत. गेल्या सभागृहातील ६९ सदस्य आणि १२ सभापतींना लॅपटॉप देण्याचा निर्णय अर्थ समितीने घेतला. त्यानुसार जून २०१२ मध्ये या सर्वांना लिनोव्हा कंपनीचे लॅपटॉप देण्यात आले. ३६ हजार ६०० रुपयांना एक लॅपटॉप याप्रमाणे २९ लाख रुपये खर्चून हे लॅपटॉप देण्यात आले. आता जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. नवी पदाधिकारी निवडले गेले. दुसरी सर्वसाधारण सभाही तोंडावर आली तरी जुने लॅपटॉप अजून जमा करण्यात आले नाहीत. वित्त विभागाने हे लॅपटॉप परत जमा करण्याबाबत विषय समिती सभापतींच्या स्वीय सहाय्यकांना पत्र दिले होते. आपापल्या विषय समितीमधील सदस्यांना हे पत्र देऊन त्यांच्याकडून लॅपटॉप जमा करण्याची सूचना त्यामध्ये होती. मात्र, ८१ पैकी केवळ १७ जणांनीच हे लॅपटॉप परत केले आहेत. ते सुस्थितीत असल्याचेही सांगण्यात आले; परंतु आता उर्वरित जिल्हा परिषद सदस्य आणि सभापतींकडून लॅपटॉप परत कसे घ्यायचे, असा प्रश्न वित्त विभागासमोर पडला आहे.पुन्हा सदस्यांना लॅपटॉप नाहीतनव्या सभागृहातील सदस्यांना लॅपटॉप देणार का, अशी विचारणा सदस्यही करत आहेत. मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाचे परीक्षण करणाऱ्या पंचायत राज समितीने सदस्यांना लॅपटॉप देण्याबाबत आक्षेप घेतला आहे. आधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य, सभापतींनी काम करावे अशी जरी अपेक्षा असली तरी प्रत्यक्षात या लॅपटॉपचा वापर सदस्य, सभापती करत नाहीत. या वास्तवाच्या आधारे या समितीने ‘लॅपटॉप देऊ नयेत,’ असा शेरा मारला आहे. त्यामुळे नव्या सदस्यांना लॅपटॉप देण्यात अडचण असल्याचे सांगण्यात आले.निवडणुकीला उभेराहिलेल्यांकडून लॅपटॉप परतजिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला उभारताना या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून पुरविण्यात आलेल्या वस्तू वापरू नयेत, असा नियम आहे. त्यामुळे गेल्या सभागृहामध्ये निवडून आलेल्या आणि आता पुन्हा फेब्रुवारीमध्ये झालेल्या निवडणुकीसाठी उभारलेल्या बहुतांशी जणांनी हे लॅपटॉप परत केले आहेत. न उभारलेल्यांपैकीही एखादा सदस्य यामध्ये असू शकतो; परंतु केवळ १७ जणांनीच ते परत केले आहेत. मात्र, उर्वरित कुणीही लॅपटॉप परत दिलेला नाही. नियमाचा धाक असल्यानेच फक्त १७ लॅपटॉपच जिल्हा परिषदेकडे परत आले.सभापती बदलानंतरचे लॅपटॉप कुणाकडे?बाराही पंचायत समितीमध्ये आरक्षण बदलल्यानंतर अडीच वर्षांनी, तसेच ‘राजकीय सोयी’साठी आहे त्या सभापतींचा सव्वा वर्षांनंतर राजीनामा घेऊन नवीन सभापती केल्यानंतर हे लॅपटॉप हस्तांतरित करावेत, अशाही सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, आता हे लॅपटॉप नेमके जुन्या सभापतींकडे आहेत, त्यानंतर बदललेल्या सभापतींकडे आहेत का दोन महिन्यांपूर्वी निवडून आलेल्या सभापतींकडे आहेत याचा पत्ता प्रशासनालाही लागलेला नाही. ‘लॅपटॉप’ची मुदत संपली, आता निर्लेखनशासकीय नियमाप्रमाणे पाच वर्षांनंतर लॅपटॉप निकामी झाल्याचे समजून त्यांचे निर्लेखन केले जाते. त्यांचा लिलावही केला जाऊ शकतो. जिल्हा परिषद प्रशासन याबाबतीत धोरण ठरवेल त्यानुसार हे सर्व लॅपटॉप परत घेऊन त्यांचे निर्लेखन केले जाईल.