शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

गडमुडशिंगी देणार विमानतळासाठी जमीन

By admin | Updated: June 30, 2016 01:05 IST

तानाजी पाटील यांची माहिती : ‘टेक आॅफ’चा मार्ग खुला

कोल्हापूर : विमानतळ विस्तारीकरणासाठी वनविभागाची भूमी संपादन करण्याबाबत गडमुडशिंगी ग्रामपंचायतीने सकारात्मक ठराव देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे या विमानतळाच्या विस्तारीकरणासह येथून विमानाचे टेक आॅफ होण्याचा मार्ग खुला झाला आहे. ग्रामस्थांच्या काही मागण्यांच्या पूर्ततेची शासनाने तयारी दर्शविल्याने ग्रामपंचायतीने या ठरावाबाबत सकारात्मक पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे गडमुडशिंगीचे उपसरपंच तानाजी पाटील यांनी बुधवारी सांगितले. उपसरपंच पाटील यांनी सांगितले की, गडमुडशिंगी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेत राज्य शासनाने १९८४ पासून तब्बल अकरा प्रकल्प राबविले आहेत. त्यांच्यासाठी वेळोवेळी शासनाने गावाच्या हद्दीतील जमीन संपादित केली. यात सन १९८४ मध्ये धरणग्रस्तांसाठी ३४.९४ हेक्टर जमीन शासनाने संपादित केली. यानंतर सन २०१० मध्ये दूधगंगा डावा कालवा सुरू करण्यासाठी ४५ हेक्टर जमीन घेतली; पण कालव्याचे काम केले नाही. या दोन्ही प्रकल्पांसाठी घेतलेल्या जमिनींचा मोबदला शासनाने ग्रामस्थांना आजतागायत दिलेला नाही. तसेच ग्रामस्थांचा विरोध असतानाही सन २०१०-११ मध्ये शासनाने गावाचे विभाजन करून न्यू वाडदे गाव मंजूर केले. त्यामुळे शासनाबद्दल ग्रामस्थांची नाराजी होती. त्यातूनच त्यांनी विमानतळ विस्तारीकरणासाठी गावची जमीन संपादित करण्यासह वनविभागाच्या जमिनी घेऊ नये याबाबतचा सकारात्मक ठराव देण्यास विरोध दर्शविला होता. त्याची दखल घेऊन ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत आमदार अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, जिल्हा प्रशासनाची बैठक घेतली. त्यातून ग्रामस्थांच्या मागण्यांच्या पूर्ततेची सरकार व प्रशासनाने तयारी दाखविली आहे. याबाबत कार्यवाहीही सुरू केली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने विमानतळ विस्तारीकरणासाठी वनविभागाची जमीन घेण्यासाठीचा ना-हरकतीच्या ठरावाबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे ठरविले आहे. विकासाला गती मिळणारदेशात सध्या अस्तित्वात असलेले १६० विमानतळ वापरात आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने या वर्षीच्या अर्थसंकल्पात घेतला. या अंतर्गत सरकारने कोल्हापूरच्या विमानतळाच्या विकास व विस्ताराबाबतचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. तसेच या विमानतळाच्या विकासाचा आराखडा डिसेंबर २०१५ मध्ये भारतीय विमान पत्तन प्राधिकरणाने तयार केला आहे. विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी विस्तारीकरणासाठी वनविभागाची ५.६० हेक्टर जमीन संपादित करणे आवश्यक आहे. गेल्या दीड वर्षापासून संबंधित जमिनी देण्याबाबतचा गडमुडशिंगी ग्रामपंचायतीचा ठरावाचा मुद्दा अडखळला होता. मात्र, ठराव देण्याबाबत ग्रामपंचायत सकारात्मक झाली आहे. त्यामुळे विमानतळ विकासाला गती मिळविण्याची आशा पल्लवित झाली आहे.