शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लाडू टेंडर प्रक्रिया पारदर्शकच

By admin | Updated: August 13, 2014 00:36 IST

देवस्थानचे मत : समिती अधिकाऱ्यांचा संबंध नाही

कोल्हापूर : करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या लाडू प्रसादाचे टेंडर जिल्हाधिकारी कार्यालयात माझ्यासमक्ष व सर्व टेंडरधारकांसमोर सील असल्याची खात्री करून उघडण्यात आले. या प्रक्रियेत समितीच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांचा संबंध नाही. फक्त आपला हेतू साध्य झाला नाही म्हणून देवस्थान समितीस बदनाम करण्यासाठी लाडू टेंडरची खोटी माहिती देण्यात आली असल्याचा खुलासा देवस्थान समितीचे सदस्य हिरोजी परब यांनी केला आहे. लाडू प्रसाद ठेका देवस्थान समितीचे प्रभारी अध्यक्ष राजाराम माने व सचिव संजय पवार यांनी बेकायदेशीररीत्या मंजूर केल्याचे प्रसिद्ध झाले आहे. मात्र, हे टेंडर फोडले गेले त्यावेळी मी स्वत: व टेंडरधारक उपस्थित होते. सर्वांच्या कागदपत्रांची पूर्तता झाल्याची खात्री करूनच दराचे लखोटे उघडण्यात आले व सर्वांत कमी दर असलेल्या ठेकेदारास तीन महिन्यांच्या मुदतीसाठी लाडूची प्रत, अन्नभेसळ परवाना अशा कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या अटीवर टेंडर मंजूर करण्यात आले. या प्रक्रियेत समितीच्या कोणत्याही कर्मचाऱ्याचा संबंध नाही. दोन वर्षांपूर्वीदेखील देवस्थान समितीस लाडू प्रसादावरून बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी गौरी बचत गटाला लाडू बनविण्यासाठीचेबेसन २७ रुपये किलो या दराने ठेका देण्यात आला होता व उच्च प्रतिचे साहित्य देवस्थान समितीकडून पुरविण्यात येत होते. गेली दोन वर्षे कोणतीही तक्रार नव्हती. मात्र, मंदिर परिसरात भट्टी लावणे, गॅस सिलिंडर लावणे योग्य नसल्याने यंदा संपूर्ण साहित्यांसह लाडू प्रसादाचा ठेका महिला बचत गटास दिलेला असून, ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शीपणाने करण्यात आली आहे, असे या निवेदनात परब यानी म्हटले आहे. ‘अन्न औषध’ किती सजग?दोन वर्षांपूर्वी लाडूला बुरशी आल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने लाडूची तपासणी करून भेसळ नसल्याचा अहवाल दिला. आता एका संघटनेने तक्रार केल्यावर अधिकाऱ्यांनी लाडूच्या तपासणीसाठी धाड टाकली. वास्तविक दर महिन्याला किंवा ठरावीक कालावधीनंतर प्रशासनाने ही तपासणी करणे क्रमप्राप्त असते. ज्या व्यवसायाचे उत्पन्न वर्षाला १२ लाखांवर असते. ठेकेदाराने किंवा व्यावसायिकाने अन्न व औषध प्रशासनाकडे त्याची रितसर नोंदणी करून व्यवसाय परवाना गरजेचे असते. मात्र, ठेकेदार बचतगटाकडे हा परवाना नसल्याचे अन्न व औषध विभागाला आढळले. लाडूच्या पाकिटावर त्यासाठी वापरलेले पदार्थ, लाडू बनवलेला दिवस व तो संपविण्याचा कालावधी लिहिलेला नाही. याचा अहवाल देवस्थान समितीला देण्यात येणार आहे.