शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

कुरुंदवाडला सोमवारपासून राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धा

By admin | Updated: January 9, 2016 01:26 IST

अठरा राज्यांतील संघ : शहरात पहिल्यांदाच आयोजन

कुरुंदवाड : येथील साने गुरुजी विद्यालयात ११ ते १३ जानेवारी या कालावधीत १९ वर्षांखालील मुले व मुलींच्या ६१ व्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रासह देशातील अठरा राज्यांतील संघ सहभागी होणार असून, खा. राजू शेट्टी, आ. उल्हास पाटील, जिल्हाधिकारी अमित सैनी यांच्या हस्ते सोमवारी (दि. ११) सायंकाळी स्पर्धेचे उद्घाटन होणार असल्याची माहिती क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई व विकास माने यांनी पत्रकार बैठकीत दिली.डिसेंबर २०१५ मध्ये राज्यस्तरीय स्पर्धा झाल्या होत्या. त्यातील विजेतेपदाच्या स्पर्धकांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून वेटलिफ्टिंगच्या राष्ट्रीय स्पर्धा कुरुंदवाड शहरात प्रथमच होत आहेत. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, केरळ, मध्य प्रदेश, ओडिशा, उत्तर प्रदेश अशा देशभरातील अठरा राज्यांतील संघ सहभागी होणार आहेत.भारतीय खेळ महासंघ, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत विभागीय उपसंचालक कार्यालय, क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर विभाग, कुरुंदवाड दत्त कनिष्ठ महाविद्यालय, साने गुरुजी विद्यालय व हर्क्युलस जिम्नॅशिअम यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा घेण्यात येत असून या स्पर्धेचे बॅँक आॅफ महाराष्ट्र प्रायोजक आहेत. खेळाडूसह प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक पंच, तांत्रिक अधिकारी असे एकूण ३५० खेळाडू व पदाधिकारी सहभागी होत असून आयोजन समितीच्यावतीने सर्वांची मोफत निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.सोमवारी होणाऱ्या या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी राज्य क्रीडा व युवक सहसंचालक नरेंद्र सोपल, विभागीय उपसंचालक उदय जोशी, माणिक वाघमारे, जिल्हा क्रीडा अधिकारी गौतम पाटील, गणपतराव पाटील, साने गुरुजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, नगराध्यक्षा मनीषा डांगे यांच्यासह राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.पत्रकार बैठकीला अजित पाटील, प्राचार्य अण्णासाहेब माने-गावडे, वेटलिफ्टर पंच विजय माळी उपस्थित होते.