शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

हुपरी येथे कोविड सेंटर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:18 IST

हुपरीतील एका महाविद्यालयाच्या वसतिगृहात सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरच्या पाहणीसाठी सकाळी तहसीलदार शरद पाटील, नगराध्यक्षा जयश्री महावीर गाट, तालुका ...

हुपरीतील एका महाविद्यालयाच्या वसतिगृहात सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरच्या पाहणीसाठी सकाळी तहसीलदार शरद पाटील, नगराध्यक्षा जयश्री महावीर गाट, तालुका आरोग्य अधिकारी सुहास कोरे, मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार-ढेरे, डॉ. विद्या बनसोडे आदी आले होते. हे सर्वजण कोविड केअर सेंटर यंत्रणेच्या तयारीची पाहणी करीत असतानाच शहरातील तपासणीत पॉझिटिव्ह आढळून आलेल्या १२ भाजीपाला विक्रेत्यांना या ठिकाणी उपचारासाठी त्वरित दाखल करून घेतले. मंजुरी मिळाल्यानंतर केवळ एका दिवसातच सर्व यंत्रणा उभी करत प्रत्यक्षात ६० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. या वेळी तहसीलदार शरद पाटील, तालुका आरोग्य अधिकारी सुहास कोरे, मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार, डॉ. विद्या बनसोडे, पक्षप्रतोद रफिक मुल्ला, नगरसेवक सुभाष कागले, लक्ष्मी साळोंखे, जयराज गायकवाड, शशिकांत मधाळे, राजेंद्र साळोंखे, नगरअभियंता जावेद मुल्ला, सचिन कांबळे, प्रसाद पाटील, अश्विनी आडसुळ, उदय कांबळे, शुभम वाघेला आदी उपस्थित होते.

------

चौकट

नगराध्यक्षा जयश्री गाट यांनी महावीर गाट सोशल फाउंडेशनच्या वतीने या सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णाच्या भोजन व्यवस्थेकरिता २५ हजार रुपयांची देणगी जाहीर केली.या कोविड केअर सेंटरच्या उभारणीमुळे हुपरी शहर व परिसरातील गोरगरीब रुग्णाची चांगली सोय होणार आहे. या वेळी नगराध्यक्षा गाट यांनी शहरातील सर्व नागरीकाना व सामाजिक संस्था, संघटना यांना मदतीचे आवाहन केले आहे.

--

फोटो ओळी -हुपरी व परिसरातील गोरगरीब रुग्णांच्या सोयीसाठी आज पासून हुपरी येथे मोफत कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. यावेळी तहसीलदार शरद पाटील, नगराध्यक्षा जयश्री गाट, तालुका आरोग्य अधिकारी सुहास कोरे, मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार, डॉ. विद्या बनसोडे आदी उपस्थित होते.