शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातच्या प्रदर्शनात कोल्हापुरी कला

By admin | Updated: December 25, 2014 00:02 IST

कोल्हापूरचे चाळीस कलावंत : बडोदामध्ये १६ फेब्रुवारीपासून राष्ट्रीय कला प्रदर्शन

कोल्हापूर : बडोदा (गुजरात) येथे भरविण्यात येणाऱ्या स्पंदन नॅशनल आर्ट फेस्टिव्हल या राष्ट्रीय कला प्रदर्शनामध्ये कोल्हापुरातील तीन पिढ्यांचे कलावंत सहभागी होणार आहेत. एकशे चौसष्ठ वर्षांची परंपरा असलेल्या कोल्हापुरी स्कूलचे ४0 कलावंत १६ ते २५ फेब्रुवारी यादरम्यान दोन टप्प्यांत आपल्या कलाकृतींसह या राष्ट्रीय कला प्रदर्शनात सहभागी होणार आहे. परराज्यात एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने कोल्हापूरचे कलाकार सहभागी होण्याचा हा अलीकडील काळातील पहिलाच प्रसंग आहे.बडोदा येथील आकृती आर्ट गॅलरी येथे भरणाऱ्या या प्रदर्शनामध्ये गुजरात आणि महाराष्ट्रातील चित्रकलेच्या विविध शैलींचीही देवाण-घेवाण होणार आहे. या प्रदर्शनामध्ये प्रत्येक कलावंतासाठी चार दिवस राखून ठेवण्यात आले असून त्या कलावंतांच्या चित्रांची विक्रीही या प्रदर्शनात होणार आहे. ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव यांच्यासह गतवर्षी चित्रकलेचे शिक्षण घऊन बाहेर पडणाऱ्या १९ वर्षीय नवोदित चित्रकारांचाही समावेश या प्रदर्शनामध्ये असणार आहे, हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य. आर्ट अ‍ॅसिलिटी या नावाने स्थापन झालेल्या आर्ट क्युरेटर विद्याश्री डाके यांच्या कला संस्थेचे वीस कलावंत गुजरात येथे जात आहेत. यावेळी चित्रकलेसोबत कोल्हापूरच्या शिल्पकलेचाही सहभाग या प्रदर्शनात आहे. क्रीएटिव्ह पेंटिंग, रिअ‍ॅलिटी पेटिंग, क्रिएटिव्ह क्लप्चर या प्रकारांचा समावेश या प्रदर्शनात असणार आहे. स्पंदन नॅशनल आर्ट फेस्टिव्हल दरवर्षी विविध राज्यात भरते. यंदा ते गुजरातमध्ये बडोदा येथे भरत आहे. या प्रदर्शनामध्ये प्रत्येक राज्यातील कलावंतांना सहभागी करण्यात येते. असे असले तरी देशातील नामांकित आर्ट गॅलरीमध्ये एकाच शहरातील कलावंत इतक्या मोठ्या संख्येने अशाप्रकारच्या राष्ट्रीय कला प्रदर्शनात सहभागी होण्याचा हा अलीकडचा पहिलाच प्रसंग म्हणता येईल.जगातील विविध ठिकाणी कोल्हापूरच्या कलापरंपरेचा गौरवही झाला होता; परंतु इतक्या मोठ्या संख्येने सहभागी होणारा कदाचित हा पहिलाच प्रसंग असेल. कोल्हापूरची आधुनिक कला यानिमित्ताने परराज्यातील कलाप्रेमींसाठी नजराना ठरू शकेल.-अजय दळवी, प्राचार्य,दळवीज आर्ट इन्स्टिट्युट, कोल्हापूर.शाहू महाराज, राजाराम महाराजांनी चित्रकलेला प्रोत्साहन दिले, त्या पूर्वीच्या कोल्हापूर संस्थानामधून कलावंतांच्या स्वागतासाठी पूर्वीच्या बडोदा संस्थानचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्या वारसदारांना या प्रदर्शनात सहभागी करुन घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. -अनंत विकास, संयोजक,स्पंदन नॅशनल आर्ट फेस्टिव्हल, बडोदा.