शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेपूर्वी कोल्हापूर ‘टोलमुक्त’

By admin | Updated: August 10, 2015 01:15 IST

चंद्रकांतदादा पाटील : कार्यप्रणाली निश्चित करण्यासाठी उद्या बैठक

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने राज्य टोलमुक्तीचे दिलेले आश्वासन ९० टक्के पूर्ण केले आहे. कोल्हापुरातदेखील टोलमुक्तीच्या दृष्टीने निर्णय घेतला जाईल. याबाबतचा निर्णय कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी जाहीर होईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘एमएच ०९’ वगळून कोल्हापूर जिल्हा टोलमुक्त झाला असता; परंतु टोलविरोधी कृती समितीचा आग्रह आडवा आला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण टोलमुक्तीसाठी सकारात्मकता दाखविली. त्यानुसार त्याची प्रक्रिया सुरू केली. मूल्यांकन पूर्ण करून टोलविरोधी कृती समितीचे मत लक्षात घेऊन कार्यवाही सुरू आहे. आपण म्हणतो, ‘आयआरबी’ला व्याजासहित ३०० कोटी द्यावे लागतात. याउलट ‘आयआरबी’ म्हणते व्याजासहित ८०० कोटी रुपये द्यावे लागतात. याबाबत सरकार आणि ‘आयआरबी’ यांच्यात चर्चा होऊन पाया निश्चित केला जाईल. त्या दृष्टीने बैठका सुरू होतील. यातून अंतिम निर्णयासाठी थोडा वेळ लागणार आहे. या दृष्टीने मोडस आॅपरेटिंग करण्याबाबतची कार्यप्रणाली निश्चित करण्यासाठी उद्या, मंगळवारी बैठक होईल. यासाठी टोलविरोधी कृती समितीचे प्रतिनिधी उपस्थित असतील. ३० सप्टेंबरला आचारसंहिता घोषित होण्यापूर्वी टोलमुक्तीचा निर्णय होईल, अशी मला खात्री आहे. हा निर्णय टोल कायमचा बंद होईल, असाच असेल. (प्रतिनिधी)ठोस निर्णय हवा... अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढवूसरकारनेच नियुक्त केलेल्या मूल्यांकन समितीच्या उपसमितीने २३९ कोटी ६४ लाख रुपयांचे वास्तववादी मूल्यांकन करून तो अहवाल सादर केल्यामुळे ‘आयआरबी’चे पितळ उघडे पडले आहे. उद्या, मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संबंधित खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे, चंद्रकांतदादा पाटील यांच्याबरोबर टोलविरोधी कृती समितीचे सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, आर्किटेक्ट असोसिएशनचे राजेंद्र सावंत, बार असोसिएशनचे पदाधिकारी, तसेच ज्या ज्या घटक संस्था या समितीत आहेत, त्यांचे एक प्रतिनिधी या बैठकीस हजर राहणार आहेत. आम्हाला ठोस निर्णय या बैठकीद्वारे हवा आहे. तो जर मिळाला नाही, तर आम्ही आमच्या आंदोलनाची तीव्रता आणखी वाढवू, असा इशारा टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे यांनी दिला आहे.