शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात आता संचारबंदी नाही, तर जमावबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:13 IST

कोल्हापूर : महापालिका क्षेत्रात लागू केलेल्या संचारबंदीच्या निर्णयात राज्य शासनाने अंशत: बदल केला आहे. संचारबंदी मागे घेऊन फक्त जमावबंदी ...

कोल्हापूर : महापालिका क्षेत्रात लागू केलेल्या संचारबंदीच्या निर्णयात राज्य शासनाने अंशत: बदल केला आहे. संचारबंदी मागे घेऊन फक्त जमावबंदी लागू केली आहे. त्यामुळे आता येथून पुढे पाच जानेवारीपर्यंत रात्री अकरा ते सकाळी ६ या वेळेत बाहेर फिरता येणार आहे, पण एकाच ठिकाणी पाचहून अधिक लोकांना एकत्र जमता येणार नाही.

ब्रिटनमध्ये कोरोनासदृश नव्या आजाराचा प्रसार झाल्याच्या पार्श्वभूमीवर विमान प्रवाशांच्या माध्यमातून प्रादुर्भाव वाढू नये, याची दक्षता म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रात्रीची संचारबंदी लागू केली होती. तथापि यावरून बरीच टीका झाल्यानंतर या संचारबंदीच्या आदेशात किरकोळ सुधारणा केली गेली आहे. याची अंमलबजावणी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे.

त्यानुसार कोल्हापुरातही या संचारबंदीच्या आदेशात किरकोळ बदल करून त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत आता नागरिकांना मुक्तपणे संचार करता येणार आहे. पोलीस त्यांना अटकाव करणार नाहीत. पण पाचपेक्षा जास्त लोकांनी मात्र एकत्र जमता कामा नये, अशी अट घालण्यात आली आहे.

याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाो गलांडे यांच्याकडे विचारणा केली असता, शासन आदेशानुसार हा बदल लागू करण्यात आला आहे, त्याचे तंतोतंत पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

संचारबंदी शिथिल, तरी लाभ नाहीच

रात्रीच्या संचारबंदीतून नागरिकांची सुटका झाली असली तरी जमावबंदी कायम असल्यामुळे, सवलत मिळूनही काही उपयोग होणार नाही. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पार्टी आयोजनांवर निर्बंध कायम राहणार असल्याने हॉटेल व्यावसायिकांमध्ये नाराजी आहे. रात्री अकरापर्यंतच हॉटेल्स सुरू ठेवण्याची मुभा असणार आहे.