शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

कॅशलेश व्यवहारासाठी कोल्हापूरची एसटी सज्ज

By admin | Updated: April 6, 2017 16:06 IST

टोल भरण्यासाठी कोल्हापूर विभागातील ३३१ एसटीच्या बसवर ई-टॅग प्रणाली ,आरक्षणासाठी स्वाइप मशिन्सचा वापर

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. ६ : नोटाबंदीनंतर संपूर्ण देशभरात कॅशलेस व्यवहार करण्यावर भर सरकार करत आहे. काळाची हीच गरज ओळखून राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागानेही कॅशलेस व्यवहारासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. टोल भरण्यासाठी कोल्हापूर विभागातील ३३१ एसटीच्या बसवर ई-टॅग प्रणाली लावण्यात आली आहे. तर आरक्षणासाठी स्वाइप मशिन्सचा वापर केला जात आहे. सरकारने ५०० व १००० जुन्या नोटांवरील बंदीनंतर कॅशलेसचा पर्याय सार्वजनिक वाहतूक सेवांकडून निवडण्यात आला आहे. एस.टी महामंडळाकडूनही कॅशलेसचा पर्याय स्विकारण्यात आला आहे. टोल भरताना प्रवाशांचा वेळ वाया जातो, यावर पर्याय म्हणून एसटी बसवर ‘ई-टॅग’ बसवण्यात आल्या आहेत. यामुळे टोलची रक्कम थेट बँक खात्यातूनच वजा होतेच पण १० टक्के सूट एसटी बसना मिळत आहे. ई टॅग गाड्यासाठी प्रत्येक टोल नाक्यावर वेगळा बूथची व्यवस्था केली आहे. याआधीच महामंडळाने आरक्षणासाठी अँड्रॉइड मोबाईल अ‍ॅप सुरू केले आहे. तर विमान, रेल्वेच्या रिझर्व्हेशन सुविधेप्रमाणे एसटीच्या प्रवाशांनाही आॅनलाइन आरक्षणाची सोय आहे. तसेच, एसएमएसद्वारे आरक्षण आदी सोयीसुविधा एसटी महामंडाळाकडून पुरवल्या जात असताना विविध आगारांतील तिकीट खिडक्यांवर आरक्षण करताना रोखीने व्यवहार केले जात होते. त्यामुळे सुट्टया पैशांवरून कर्मचार्यांसमवेत प्रवाशांचे वादाचे प्रसंग उद्भवत होते. नोटाबंदीच्या काळात आरक्षणादरम्यान प्रवाशांचे होणारे हाल पाहता महामंडळाने संपूर्ण राज्यातील तिकीट बुकिंग खिडक्यांना स्वाइप मशिन्स वापरण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार कोल्हापूर विभागाने मध्यवर्ती बसस्थानक व संभाजीनगर येथे तिकीट बुकिंग खिडक्यांना स्वाइप मशिन्स बसविले आहे. तिकटी खिडक्यांवर डेबिट, क्रेडिट कार्ड स्वाईप करून तिकिटांचे शुल्क भरता येणार आहे. तसेच विद्यार्थी पासची रक्कम ही स्वाइप मशिन्स भरता येणार आहे. (प्रतिनिधी)