शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर मूक आंदोलन फोटो ओळी-०१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:17 IST

मूक आंदोलन... हवे मराठा आरक्षण मराठा समाजाला घटना दुरुस्ती करून आरक्षण मिळावे व अन्य पाच प्रमुख मागण्यांसाठी कोल्हापुरात बुधवारी ...

मूक आंदोलन... हवे मराठा आरक्षण

मराठा समाजाला घटना दुरुस्ती करून आरक्षण मिळावे व अन्य पाच प्रमुख मागण्यांसाठी कोल्हापुरात बुधवारी खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली नर्सरी बागेतील शाहू समाधीस्थळी मूक आंदोलन झाले. त्याला राज्यभरातील सकल मराठा समन्वयक उपस्थित होते. या आंदोलनस्थळी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी राज्य सरकारची भूमिका मांडली. (आदित्य वेल्हाळ)

१६०६२०२१-कोल-मूक आंदोलन ०२

मराठा समाजाला घटना दुरुस्ती करून आरक्षण मिळावे व अन्य पाच प्रमुख मागण्यांसाठी कोल्हापुरात बुधवारी खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली नर्सरी बागेतील शाहू समाधीस्थळी मूक आंदोलन झाले. त्याला राज्यभरातील सकल मराठा समन्वयक उपस्थित होते. या आंदोलनात शहाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे, संयोगिताराजे, खासदार संभाजीराजे व वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर पाऊस कोसळत असतानाही बसून होते.

१६०६२०२१-कोल-मूक आंदोलन ०३

मराठा समाजाला घटना दुरुस्ती करून आरक्षण मिळावे व अन्य पाच प्रमुख मागण्यांसाठी कोल्हापुरात बुधवारी खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली नर्सरी बागेतील शाहू समाधीस्थळी मूक आंदोलन झाले. त्याला राज्यभरातील सकल मराठा समन्वयक उपस्थित होते. या आंदोलनात माजी आमदार मालोजीराजे, संयोगिताराजे, खासदार संभाजीराजे व वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर पाऊस कोसळत असतानाही बसून होते.

१६०६२०२१-कोल-मूक आंदोलन ०४

मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात बुधवारी झालेल्या मूक आंदोलनात इचलकरंजीच्या कार्यकर्त्याने फडकवलेला हा झेंडा लक्ष वेधून घेत होता. (आदित्य वेल्हाळ)

१६०६२०२१-कोल-मूक आंदोलन ०५

मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात बुधवारी झालेल्या मूक आंदोलनाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आंदोलनस्थळी जात पाठिंबा दिला व तसे पत्र खासदार संभाजीराजे यांच्याकडे दिले. (आदित्य वेल्हाळ)

१६०६२०२१-कोल-मूक आंदोलन ०६

मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात बुधवारी झालेल्या मूक आंदोलनात सहभागी होण्यापूर्वी खासदार संभाजीराजे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीला फुले वाहून अभिवादन केले. (आदित्य वेल्हाळ)

१६०६२०२१-कोल-मूक आंदोलन ०७

मराठा समाजाला घटना दुरुस्ती करून आरक्षण मिळावे व अन्य पाच प्रमुख मागण्यांसाठी कोल्हापुरात बुधवारी खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली नर्सरी बागेतील शाहू समाधीस्थळी मूक आंदोलन झाले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेले वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची खासदार संभाजीराजे व शाहू छत्रपती यांनी भेट घेतली. (आदित्य वेल्हाळ)

१६०६२०२१-कोल-मूक आंदोलन ०८

मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात बुधवारी मूक आंदोलन झाले. शाहू समाधीस्थळाच्या पार्श्वभूमीवर शाहूंना साक्षी ठेवूनच हे आंदोलन झाले. (आदित्य वेल्हाळ)

१६०६२०२१-कोल-मूक आंदोलन ०९

मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात बुधवारी शाहू समाधीस्थळी मूक आंदोलन झाले. त्यावेळी कोल्हापूरसह राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांची अशी गर्दी उसळली होती. (आदित्य वेल्हाळ)

१६०६२०२१-कोल-मूक आंदोलन १०

मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात बुधवारी शाहू समाधीस्थळी मूक आंदोलन झाले. या आंदोलनापूर्वी शाहीर दिलीप सावंत यांच्या पथकाने पोवाडा सादर करून वातावरणात चैतन्यमय केले. (आदित्य वेल्हाळ)

१६०६२०२१-कोल-मूक आंदोलन ११

मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात बुधवारी झालेल्या मूक आंदोलनाला भाजपने पाठिंबा दिला होता. या पक्षाचे माजी खासदार धनंजय महाडिक व माजी आमदार अमल महाडिक यांनी पावसातच या आंदोलनात सहभाग नोंदवला. (आदित्य वेल्हाळ)

१६०६२०२१-कोल-मूक आंदोलन १२

आणि टाळ्या झाल्या...

मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात बुधवारी शाहू समाधीस्थळी मूक आंदोलन झाले. तिथे लोकप्रतिनिधींसाठी खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या, परंतु पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह सर्वच नेत्यांनी भिजलेल्या लॉनवर बसणे पसंत केले. ते पाहून मूक आंदोलनातही लोकांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. (आदित्य वेल्हाळ)