शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

कोल्हापूर, सांगलीला वळवाने झोडपले

By admin | Updated: April 28, 2015 00:32 IST

गारांचा खच : विजांचा कडकडाट, जोरदार पावसाने वीजपुरवठा खंडित

कोल्हापूर : सोसाट्याचे वारे, टपोऱ्या गारा, विजांचा कडकडाट व आडव्या-तिडव्या पावसाने सुमारे अर्धा तास कोल्हापूर शहराला अक्षरश: झोडपून काढले. जोरदार पावसाने शहरातील सखल भागांत पाणी तुंबल्याने वाहतुकीवर, तर वीज खंडित झाल्याने कामकाजावरही परिणाम झाला. ग्रामीण भागातही जोरदार पाऊस झाला असून, हा पाऊस पिकांना पोषक आहे. गेले आठ-दहा दिवस जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. सकाळी आठपासूनच अंगाची लाही-लाही करणाऱ्या उष्म्याने नागरिक अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. दुपारी बारानंतर तर घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे, इतका तापमानाचा पारा वाढला आहे. सोमवारी सकाळपासून कमालीचा उष्मा वाढला होता. सायंकाळी पावणेसहा वाजता पाऊस सुरू झाला. सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. त्यानंतर लहान लहान गारांचाही शिडकावा सुरू झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. दहा मिनिटे जोरात वारे वाहत होते. वाऱ्याला कमालीची गती असल्याने झाडांचा अक्षरश: पाळणा झाला. अनेक ठिकाणच्या घरांवरील पत्रेही उडून केले, तर शहरात विविध ठिकाणी लावलेले डिजिटल फलकही वाऱ्याने तुटले. पाऊस आडवा-तिडवा असल्याने अनेकांच्या घरांत, दुकानांत पाणी आल्याने त्रेधातिरपीट उडाली. ग्रामीण भागातही जोरदार पाऊस झाला. हा पाऊस पिकांसाठी पोषक आहे. पाण्याअभावी करपणाऱ्या पिकांना या पावसाने थोडा दिलासा मिळाला आहे; पण वीट व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी) ताकारी, बावचीत गारपीटसांगली : साांगली जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी ५.३0 च्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. वाळव्यासह इस्लामपूर, बोरगाव, नेर्ले, कामेरी येथे अर्धा तास पाऊस झाला. ताकारी, गोटखिंडी, बावची येथे जोरदार गारपीट झाली. कामेरी येथे ग्रामदैवताच्या यात्रेसाठी आलेल्या भाविकांची व यात्रेकरुंची त्रेधा उडाली. मिरज पूर्व भागातील एरंडोली, मल्लेवाडी, सलगरे तसेच जत शहरासह संख, दरीबडची परिसरात तुरळक प्रमाणात पाऊस झाला. शिराळा तालुक्यात अर्धा तास झालेल्या पावसाने आंबा व मक्याचे नुकसान झाले.