शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर पोलिसांत ‘मागेल त्याला सुटी’

By admin | Updated: October 22, 2014 23:53 IST

मिठाईचाही बोनस : तीन हजार पोलिसांना वाटप

कोल्हापूर : दोन वर्षांतून पहिलीच दिवाळी कुटुंबांसोबत साजरी करण्याचे भाग्य कोल्हापूर पोलिसांना मिळाले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिठाईचे वाटप केले. पोलीस दलामध्ये पहिल्यांदाच मिठाईबरोबर ‘मागेल त्याला सुटी’ मिळाल्याने पोलीस भारावून गेले आहेत. टोल आंदोलन, मोर्चे, दंगली यासह लोकसभा आणि विधानसभा निवडणूक बंदोबस्तामुळे पोलिसांची दमछाक झाली आहे. गेल्या दोन वर्षांत ऊन, वारा, पावसाचा सामना करत कोणत्याच सणासुदीला त्यांना घराकडे जाता आले नाही. निवडणूक बंदोबस्त संपल्याने या चेहऱ्यांना गावाकडची ओढ लागून राहिली आहे. त्यांच्या या त्यागाची दखल पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांनी घेत ‘मागेल त्याला सुटी’ तसेच तीन हजार कर्मचाऱ्यांचे तोंड गोड करण्यासाठी मिठाईचे वाटप केले. दिवाळीनिमित्त काही आनंदाचे क्षण कुटुंबासोबत घालवता आल्याने बहुतांशी पोलिसांनी पोलीस कँटिनमधून दिवाळीची खरेदी केली तसेच पोलिसांच्या मुलांसाठी थेट फॅक्टरीमधून फटाके मागवून ते कँटिनमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. येथून फटाक्यांचीही मोठ्या प्रमाणात विक्री झाली. दिवाळीनिमित्त प्रत्येकजण भेटवस्तू देऊन दिवाळीच्या शुभेच्छा देत असतात. त्यानिमित्त डॉ. शर्मा यांनी खात्यातील तीन हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिठाईचे वाटप केले. पोलीस दलामध्ये पहिल्यांदाच मिठाईचे वाटप झाल्याने सर्वच पोलीस आनंदाने भारावून गेले. लक्ष्मीपुरी, जुना बुधवार पेठ, मुख्यालय, परिसरातील पोलीस वसाहतींमध्ये आपल्या सहकाऱ्यांच्या घरी पोलीस दिवाळीनिमित्त फराळ जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. (प्रतिनिधी)