शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर लोकसभा निवडणूक २०१९ : कोण जिंकेल कोल्हापूर; संजय मंडलिक की धनंजय महाडीक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 10:21 IST

पाचवी फेरी अखेर : कोल्हापूर मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक ६०३९९ नी आघाडीवर. उत्तर करवीर अजुन फेरी बाकी

ठळक मुद्देकोल्हापूर मतदार संघातून पहिल्या फेरीत शिवसेनेचे संजय मंडलिक 19505 ने आघाडीवर आहे.कोल्हापूर मतदार संघातून कोल्हापूर उत्तर मतदार संघ वगळता इतर पाच मतदार संघात शिवसेनेचे संजय मंडलिक 14656 ने आघाडीवर

कोल्हापूर: २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उसळलेल्या मोदी लाटेत कोल्हापूर मतदार संघात राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांनीच बाजी मारली होती. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा पराभव केला होता. राष्ट्रवादीचे धनंजय महाडीक हे निवडून आले होते. त्यांनी संजय मंडलिक यांचा ३३, २५९ मतांनी पराभव केला होता. महाडिक यांना एकूण ६ लाख ७ हजार ६६५ इतकी मत मिळाली होती. यावेळीही या मतदार संघात दोघांनीही विजयाचा दावा केला आहे. एकमेकांमधील लढतीची ही चुरस त्यातच आमंच ठरलंयची पडलेली अधिक भर यामुळे ही लढत अत्यंत चुरशीची झालेली आहे. यामुळे  प. महाराष्ट्राचे या निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे.यंदाच्या निवडणुकीतही शिवसेनेचे संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडीक यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केले असून एका बाजूला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची सर्वस्वी ताकद व केलेला प्रचार तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेली ही प्रतिष्ठेची निवडणूक त्यामुळे या निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. दोन बड्या नेत्यांच्या लढाईत कार्यकर्त्यांनीही आपली सर्वस्वी ईर्शा पणाला लावली असल्याने ही निवडणूक स्वत: बरोबरच गावपातळीच्या कार्यकर्त्यांपर्यंत लक्षवेधी ठरली आहे.लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला  सकाळी  सुरुवात झाली इतक्या फेºया झाल्या असून यात कोल्हापूर मतदार संघातील, कोल्हापूर मतदार संघातून पहिल्या फेरीत शिवसेनेचे संजय मंडलिक 19505 ने आघाडीवर आहे.गेल्या निवडणुकीत धनंजय महाडिक यांना ६ लाख ७ हजार ६६५ इतकी मत मिळालील होती तर संजय मंडलिक यांना ५ लाख ७४ हजार ४०६ इतकी मत मिळाली होती. यंदाच्या निवडणुकीत एकूण मतदान १८ लाख ६८ हजार २३५ इतके मतदान झाले असून . त्यामुळे मतमोजणीची वाढलेली धाकधुक आणि उन्हाचा चढता पारा यामुळे घामेघुम झालेले नेते व कार्यकर्त्यांना काही तासातच कशी व कोणाच्या बाजूने दिलासा देणारी ठरेल ही वेळ ठरवेल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालkolhapur-pcकोल्हापूर