शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान संतापला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
3
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
4
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
5
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
6
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
7
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
8
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
9
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
10
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
11
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
12
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
13
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
14
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
15
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 
16
आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार ४ महिन्यांत निवडणुका घ्या; मिनी विधानसभेचा मार्ग मोकळा
17
पदवीसाठी २७ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी ; उद्यापासून प्रवेश
18
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
19
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
20
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन

कोल्हापूर- ई-प्रचाराचा ‘फड’ जोरात

By admin | Updated: October 5, 2014 23:06 IST

घोषवाक्यांची ‘टर’: उणी-दुणी काढणे, व्यंगात्मक प्रचाराला वेग

संतोष पाटील -कोल्हापूर- सर्वच पक्षांसह उमेदवारांनी वैयक्तिक घोषवाक्ये प्रचारात आणली आहेत. त्यातूनच ‘व्हॉटस् अ‍ॅप’ व ‘फेसबुक’वर एकमेकांची ‘टर’ उडविणारी पोस्टरबाजी रंगली. सोशल मीडियातील या फुकटच्या ई-प्रचाराचा फड सध्या जोरात रंगला. कोणाचेही बंधन व आडकाठी नसलेला ‘सोशल’ प्रचारास एरव्ही निवडणुकीच्या प्रचाराकडे कधीही न पाहणाऱ्या वर्गाकडूनही दाद मिळत आहे.आचारसंहितेमुळे निवडणूक खर्चावर बंधने आली. त्यामुळे अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा आधार उमेदवार घेताना दिसत आहेत. महिन्यापूर्वी कार्यकर्त्यांच्या फ्रेंड रिक्वेस्टला सहा-सहा महिने उत्तर न देणारे व्हॉटस् अ‍ॅपवर क्षणात थम्ब देऊन दाद देत आहेत. फेसबुक व व्हॉटस् अ‍ॅप ही वापरण्यासाठी व फोटो अपलोड करून मतदारांचा कानोसा घेण्यासाठी फुकटच्या माध्यमांची सध्या जोरात चलती आहे. प्रत्येक कार्यक्रमाच्या व भाषणाच्या क्लीप क्षणात कार्यकर्त्यांमार्फत पोहोच केल्या जात आहेत. बल्क मेसेज किंवा आक्षेपार्ह मजकूर वगळता निवडणूक आयोगाचे सोशल मीडियाकडे लक्ष नाही. त्यामुळेच निवडणूक खर्चांपासून चार हात दूर राहात घराघरांत पोहोचण्याचा फंडा सुरू आहे.फेसबुक पेज व व्हॉटस् अ‍ॅपच्या गु्रपमध्ये उमेदवारांच्या घुसखोरीचे प्रमाणही वाढले आहे. एकमेकांच्या ग्रुपमध्ये लक्ष ठेवून आक्षेपार्ह किंवा विनोदी अंगाने आलेल्या मेसेजला ‘जशास तसे’ उत्तर देणारी मेसेजही फिरत आहेत. पेजवरील घुसखोरी रोखण्यासाठी व ‘वॉच’ ठेवण्यासाठी आयटी तज्ज्ञांचे पथकच उमेदवारांनी पदरी बाळगले आहे.सोशल मीडियावरील फोटो व व्हिडिओला मिळणारा प्रतिसाद उमेदवार जातीनिशी तपासत आहेत. कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया व सूचनांची तत्काळ दखलही घेतली जात आहे. पेज व फेसबुकवरील मिळणाऱ्या लाईकची दर तासाला मोजणी करून याची माहिती उमेदवारांना दिली जाते. नेत्यांची वाक्ये किंवा जाहिरातीतील मजकूर घेऊन त्याची टर उडविण्याचा उद्योग सध्या जोरात सुरू आहे. ‘काय करून ठेवलंय माझ्या महाराष्ट्राचं’ हा मेसेज सर्वांत लोकप्रिय ठरत आहे. कल्पकता पणाला लावून यमक जुळवत विनोदी अंगाने लिहिलेले मेसेज् व्हॉटस् अ‍ॅपवर भराभर फिरत आहेत. ‘असे मेसेज पाठवू नका, आपण सृजन मतदार आहात’ असा संदेश देणाऱ्या मेसेज्ची संख्याही वाढत आहे.व्यंगात्मक प्रमाण वाढलेपक्षप्रमुखांच्या फोटोखाली दुसऱ्याच उमेदवाराच्या प्रचारार्थ ओळी, तर राष्ट्रीय नेत्यांचा आशीर्वाद दिल्याचे रचनात्मक फोटो सोशल मीडियात फिरत आहेत. एकामेकांचे व्यंग करणारे फोटो, प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या स्लोगनला तितक्याच ताकदीने उत्तर देण्यासाठी हजरजबाबी, चुटके व कोट्या करणाऱ्या लोकांची मागणी वाढली आहे.