शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर शहर होणार ‘चकाचक’

By admin | Updated: June 11, 2016 00:30 IST

साडेतीन कोटींचा खर्च : कचरा उठावसाठी नवी यंत्रसामग्री येणार; ३०० कंटेनर, २०० घंटागाड्यांची भर

तानाजी पोवार -- कोल्हापूर --शहर व उपनगरांतील कचरा उठाव होत नाही अन् परिसरातील गावांची हद्दवाढ मागताहेत, अशी ग्रामीण भागातून टीका होत आहे. या टीका-टिप्पणीला उत्तर देण्यासाठी तसेच वेळीच कचरा उठाव होऊन संपूर्ण शहर स्वच्छ राहण्यासाठी महापालिका नव्याने चार आर. सी. वाहने, ३०० कंटेनर, तर सुमारे २०० घंटागाड्या अशी सुमारे साडेतीन कोटी रुपयांची यंत्रसामग्री खरेदी करीत आहे. तेराव्या वित्त आयोगातून हा खर्च करण्यात येणार आहे. या नवी यंत्रसामग्री लवकरच दाखल होऊन संपूर्ण शहर चकाचक ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करणार आहे.संपूर्ण शहर तसेच उपनगरातील कचरा उठाव वेळेवर होत नसल्याबाबत प्रशासनाला टीकेला सामोरे जावे लागते. शहर व उपनगरांत रस्त्याच्या कडेला कचऱ्यांनी भरलेल्या कंटेनरांचे चित्र दिसते. येथे आर. सी. वाहने कचरा उठाव करण्यासाठी येतच नाहीत, अशी ओरड होते. मोजक्याच भागात घंटागाडी सुरू आहे. जुन्या आर. सी. वाहनांवरील दुरुस्तीचा खर्च महापालिकेच्या आवाक्याबाहेर गेल्याने महापालिका नवीन चार आर. सी. वाहने, सुमारे ३०० कंटेनर व २०० घंटागाड्या खरेदी करणार आहे. यासाठी सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ही वाहने लवकरच महापालिकेच्या ताफ्यात सहभागी करून घेण्यासाठी यंत्रणा कार्यरत झाली आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. जुन्या आर. सी. वाहनांपैकी तीन दुरुस्त करून कार्यरत होेणार आहेत. ही आर. सी. वाहने चेस बदलून पाणीपुरवठा विभागासाठी टँकर म्हणून वापरणार आहेत. जुन्या तीन व नव्या चार अशा सात वाहनांद्वारे कचरा उचलला जाणार आहे. प्रतिदिन १७५ टन कचरा उठावकचरा उठावासाठी नवी आर. सी. वाहने आणि प्रत्येक प्रभागासाठी घंटागाडी उपलब्ध झाल्याने प्रतिदिनी संपूर्ण शहरातील सुमारे १७५ टन कचऱ्याचा उठाव केला जाणार आहे. दुरुस्तीचा खर्च वादग्रस्तकचरा उठावाच्या नवीन कंटेनर खरेदीची किंमत प्रत्येकी किमान ४० ते ४५ हजार रुपये असताना या जुन्याच कंटेनरवर दुरुस्तीचा प्रत्येकी १५ हजारापासून २५ हजारांपर्यंत खर्च दाखविल्याने महापालिकेचा वर्कशॉप विभाग वादग्रस्त ठरला असतानाच नव्या कंटेनर खरेदीच्या निविदेमुळे अनेकांंच्या भुवया उंचावल्या आहेत.‘झूम’चा कचराही निकालीमहापालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापनबाबत लाईन बझार येथील इनर्ट मटेरिअल टाकाळा लँडफिल्ड साईट व शुगर मिल परिसरात टाकण्याबाबत परवानगीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यास मान्यता मिळताच झूम येथील कचऱ्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.