शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-अहमदाबाद विमान सेवा पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:18 IST

कोल्हापूर : वाढत्या कोरोना संसर्गामुळे बंद झालेली इंडिगो कंपनीची कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवा शनिवारपासून पूर्ववत झाली. पहिल्या दिवशी प्रवाशांनी ६० टक्के ...

कोल्हापूर : वाढत्या कोरोना संसर्गामुळे बंद झालेली इंडिगो कंपनीची कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवा शनिवारपासून पूर्ववत झाली. पहिल्या दिवशी प्रवाशांनी ६० टक्के प्रतिसाद दिला.

कोल्हापुरातील व्यापारी, उद्योजकांचा व्यापाऱ्यानिमित्त गुजरातमधील अहमदाबाद येेथे मोठा संर्पक आहे. त्यातून अनेकदा व्यापारी वर्ग येथून पुणे अथवा मुंबईला बस, खासगी वाहनातून जात असे. तेथून विमानाने अहमदाबादला जात असे. यासह कोल्हापूर ते अहमदाबाद रेल्वेनेही जाणे होत असे. त्यातून अर्थिक व वेळ वाया जात होता. ही बाब जाणून २२ फेब्रुवारी २०२१ पासून विमान सेवा सुरू झाली. सेवेच्या पहिल्या दिवसापासून या विमानसेवेला चांगला प्रतिसाद कोल्हापूरसह अहमदाबादमधील व्यापारी वर्गाने दिला. त्यामुळे ही सेवा व्यापारी वर्गात अल्पावधीतच पसंतीला पडली. काही दिवस सेवा सुरळीत सुरू असताना अहमदाबादमध्ये महिनाभरातच कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे ही सेवा काही काळासाठी बंद करण्यात आली. ही बंद झालेली विमान सेवा शनिवारपासून पूर्ववत झाली. आठवड्यातून मंगळवार, गुरुवार, शनिवार अशी तीन दिवस ही सेवा सुरू राहणार आहे. शनिवारी सकाळी इंडिगोचे हे विमान अहमदाबादवरून सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी उड्डाण घेतले. ते कोल्हापुरात सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास उतरले. त्यानंतर काही मिनिटांची विश्रांती घेऊन सुमारे १० वाजून ४० मिनिटांनी हे विमान कोल्हापुरातून पुन्हा अहमदाबाद कडे झेपावले. दुपारी ते साडेबारा ते पाऊण वाजण्याच्या सुमारास अहमदाबाद येथे पोहोचले.