शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

कोलेकरांनी नेहमी सर्वसामान्यांचा विचार केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:25 IST

नेसरी : गडहिंग्लजचे माजी आमदार स्व. तुकाराम कोलेकरांनी अनेक जनआंदोलने, मोर्चे, उपोषणे यशस्वी करून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावले. ...

नेसरी :

गडहिंग्लजचे माजी आमदार स्व. तुकाराम कोलेकरांनी अनेक जनआंदोलने, मोर्चे, उपोषणे यशस्वी करून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावले. कधीही विचार व तत्त्वांशी तडजोड केली नाही. त्यांनी नेहमी सर्वसामान्यांचा विचार केला, असे प्रतिपादन माजी प्राचार्य एस. एस. मटकर यांनी केले.

येथील शिक्षण समिती, कसबा नेसरी संचलित शिक्षण समिती परिवारातर्फे संस्थाध्यक्ष माजी आमदार स्व. तुकाराम कोलेकर यांच्या ९ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित चिंतन सभेत ते बोलत होते. संस्थाध्यक्ष अ‍ॅड. हेमंत कोलेकर अध्यक्षस्थानी होते.

मटकर म्हणाले, स्व. कोलेकरांचा स्वभाव साधा, प्रेमळ होता. गोरगरीब जनतेवर अन्याय झाला की पेटून उठत, प्रसंगी न्याय हक्कासाठी स्वत: जाऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेत. सर्वसामान्य जनतेवर अन्याय करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्याला ते नेहमी धारेवर धरीत.

यावेळी संचालक विठ्ठल सूर्यवंशी, जानबा कालकुंद्रीकर, युवराज पाटील, डॉ. अर्चना कोलेकर, सचिव विजय नाईक, महादेव साखरे, प्र. प्राचार्य संभाजी भांबर, प्राचार्य आप्पासाहेब मटकर, मुख्याध्यापक ए. डी. लोहार, उपप्राचार्य आय. टी. नाईक, डॉ. विजय मुसाई, के. जी. कातकर यांच्यासह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

माधव भोसले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. बी. आर. दिवेकर यांनी आभार मानले.

----------------

फोटो ओळी : नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे तुकाराम कोलेकर यांच्या फोटोपूजनप्रसंगी अ‍ॅड. हेमंत कोलेकर, एस. एस. मटकर, महादेव साखरे, युवराज पाटील, जानबा कालकुंद्रीकर, विठ्ठल सूर्यवंशी, शिवाजी देसाई आदी उपस्थित होते.

क्रमांक : ०८०४२०२१-गड-०३