शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

कायदे, तरतुदींची माहिती घ्या, ‘व्हॅट’ची नाही भीती

By admin | Updated: December 15, 2014 23:56 IST

किशोर गोहोकर : व्यापाऱ्यांना कार्यक्रमात मूलमंत्र

कोल्हापूर : कायदे अन् तरतुदींची सखोल माहिती घेऊन आपली व्यवहाराची कागदपत्रे व रेकॉर्ड अद्ययावत ठेवल्यास व्यापाऱ्यांना ‘व्हॅट’ची भीती बाळगायची गरज नाही, असा मूलमंत्र विक्रीकर विभागाचे निवृत्त अतिरिक्त आयुक्त डॉ. किशोर गोहोकर (मुंबई) यांनी नुकताच येथे दिला.क्षत्रिय मराठा चेंबर आॅफ कॉमर्सतर्फे उद्यमनगरातील रामभाई सामाणी हॉल येथे ‘सभासदांसाठी प्रेरणा, ध्येयनिश्चिती, व्हॅट संदर्भातील कायदे, तरतुदी व विचार’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी ते बोलत होते.गोहोकर म्हणाले, भारतासह जगातील १३० देशांत ‘वॅट’ हा कर लागू आहे. व्यापाऱ्यांनी या कराची भीती बाळगण्याची गरज नाही. पूर्वीच्या करप्रणालीत कागदपत्रे सादर करण्यासाठी अधिकाऱ्यांकडे जावे लागायचे; परंतु व्हॅटमुळे अधिकारी व्यापाऱ्यांकडे येऊन पाहणी करतात. तपासणी अधिकाऱ्यांकडून काही चूक झाल्यास व्यापाऱ्यांनी त्यांच्या निदर्शनास आणाव्यात, यासाठी या कराविषयी कायद्याचे ज्ञान व तरतुदींची सखोल माहिती असणे गरजेचे आहे. त्रुटीबद्दल अतिउत्साही अधिकारी नोटिसा पाठवितात; म्हणून व्यापाऱ्यांनी घाबरू नये, याबाबत न्यायालयात जायचीही तरतूद आहे.यावेळी अध्यक्ष दिलीप पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूरजितसिंह पवार यांनी स्वागत केले. महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी मनोगत व्यक्त केले. अ‍ॅड. रणजित घाटगे यांनी सूत्रसंचालन केले. समीर काळे यांनी आभार मानले. यावेळी वीणा गोहोकर, सूरराजेश शहा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. ‘जीएसटी’ लागू होणार...व्हॅट आल्यावर पूर्वीचे कर गेले. ‘जीएसटी’ कर आल्यावर हा करसुद्धा जाईल. व्यापारी इतक्या प्रकारचे कर भरतात; त्यापेक्षा हा एकच कर भरणे सोयीचे आहे. तो लवकरच येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.हा फरक लक्षात घ्याड्यूटी, टॅक्स आणि सेस यांतील फरकाविषयी डॉ. गोहोकर यांनी माहिती दिली. ड्यूटी ही वस्तूंवर (उदा. कस्टम ड्यूटी) असते. टॅक्स हा वस्तूंवर, माणसांवर (उदा. इन्कम टॅक्स), सेस हा आॅक्ट्रॉयवर असतो. ड्यूटी व टॅक्सवर जमा झालेले कर हा राज्यासाठी खर्च करायचा असतो; तर सेसमधून जमा झालेला कर हा ज्या शहरातून जमा झाला, त्या ठिकाणीच खर्च करावा लागतो.